सरकारी कर्मचाऱ्यांना श्रीराम मंदिर उद्घाटनासाठी सुट्टी जाहीर, कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ? वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee News : भारतात सध्या श्रीक्षेत्र अयोध्या येथे सुरू असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या भव्य राम मंदिराची रामभक्तांच्या माध्यमातून वाट पाहिली जात होती ते राममंदिर आता राम भक्तांसाठी खुले होणार आहे.

22 जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या उद्घाटनाचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्याला आणि प्राणप्रतिष्ठाच्या सोहळ्याला जगभरातील अनेक मान्यवर उपस्थिती लावणार आहेत.

यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती प्रार्थनीय राहणार आहे. या कार्यक्रमाला देशातील अनेक राज्यांमधील मुख्यमंत्री हजेरी लावू शकतात असे बोलले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला जातील, असे वृत्त गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आले होते.

याशिवाय समाजकारणातील, राजकारणातील, सिनेसृष्टी मधील, वेगवेगळ्या विषयातील तज्ञ लोक आणि हिंदू धर्माचे धर्मगुरू देखील या कार्यक्रमाला जाणार आहेत.

22 जानेवारीला अयोध्या येथे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याच पार्श्वभूमीवर आज केंद्र शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या दिवशी शासनाने सुट्टी जाहीर केली पाहिजे अशी मागणी केली जात होती.

त्याच मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने 22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत आज महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित झाले आहे.

या परिपत्रकात शासनाने असे म्हटले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांची भावना आणि त्यांच्याकडून होत असलेली मागणी लक्षात घेता याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

देशभरातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना 22 जानेवारीला अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या सदर मंडळीला प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद घेता येणार आहे.

त्यांना हा सोहळा घरातूनच पाहता येईल आणि या सोहळ्याचा आनंद घेता येईल अशी आशा व्यक्त होत आहे. सरकारच्या या निर्णयाचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

Leave a Comment