कारमध्ये एसीचा स्पीड किती असला पाहिजे ? जास्त स्पीड असला तर मायलेज खरंच कमी होते का ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car AC Speed : घरातला एसी आठ महिने बंद असतो मात्र उन्हाळा सुरू झाला की एसी सुरू होतात. गेल्या काही दिवसांपासून तर राज्यात उष्णता प्रचंड वाढली आहे. अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. राज्यातील मालेगाव, जळगाव, सोलापूर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या आसपास नमूद केले जात आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असून एसीचा वापर वाढला आहे. फॅन आणि कुलर लावून देखील घरात उकाडा जाणवत असल्याने अनेकांनी नवीन एसी बसवला आहे. फक्त घरातच नाही तर कारने प्रवास करताना देखील चा वापर वाढू लागला आहे.

पण कार मध्ये वापरल्या जाणाऱ्या एसी बाबत नागरिकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकांच्या माध्यमातून कारमध्ये असणाऱ्या एसीचा स्पीड वाढवला तर मायलेज वर परिणाम होतो का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

यामुळे आज आपण सर्वसामान्यांच्या याच प्रश्नाचे अगदी थोडक्यात उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारमधला एसी गाडीच्या मायलेजवर परिणाम करतो का, जर एसीचा स्पीड वाढवला तर मायलेज कमी होत राहते का? याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कार मधला एसी गाडीच्या मायलेजवर परिणाम करतो का 

याचे उत्तर अनेकांना माहिती असेल. खरेतर कारच्या एसीचा मेकॅनिजन पूर्णपणे इंजिनशी जोडलेला असल्याने याचा परिणाम हा गाडीच्या मायलेज वर होत असतो. एसीच्या वापराचा कारच्या मायलेजवर परिणाम होतो, यात शन्काचं नाही.

एसी सुरु केल्यानंतर इंजिनवर अतिरिक्त भार येत असतो. एसी कंप्रेसरमुळे हे घडतं असत. कंप्रेसर हे इंजिनद्वारे बेल्टच्या माध्यमातून चालवलं जात असतं. कंप्रेसर चालवण्यासाठी एनर्जीची गरज असते जी इंजिनपासून मिळत असते.

पण, एसीचा पंखा हा कारच्या इलेक्ट्रिकल सिस्टम सोबत जोडलेला असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर एसीचा पंखा हा बॅटरीला जोडलेला असतो. पंख्याचे काम फक्त हवेला केबिनमध्ये पाठवण्याचे असते. एसीच्या पंख्याला बॅटरीकडून ऊर्जा मिळत असते.

यामुळे पंख्याचा स्पीड हा कमी किंवा जास्त केला तरी गाडीच्या इंजिन किंवा मायलेजवर परिणाम होत नसतो. म्हणजे तुम्ही एसी 1 वर चालवा किंवा 4 वर, इंधन तितकंच लागणार आहे. पण एसी वापरल्याने मायलेजवर परिणाम होतो. परंतु एसी 1 वर चालवळे किंवा 4 वर चालवले तरी सारखेच इंधन लागते.

Leave a Comment