Car Loan Interest Rate : बँक ऑफ बडोदा ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. भारतात 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत. यामध्ये बँक ऑफ बडोदाचा देखील समावेश होतो. दरम्यान BOB या देशातील एका महत्त्वाच्या पब्लिक सेक्टर बँकेच्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बँक ऑफ बडोदा या पब्लिक सेक्टर बँकेने आपल्या कार लोन च्या व्याजदरात बदल केला आहे. बँकेने कार लोनचे व्याजदर काहीसे कमी करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
यामुळे आता या बँकेच्या ग्राहकांना अगदी स्वस्तात कार लोन घेता येईल आणि आपल्याही कार खरेदीचे स्वप्न स्वस्तात पूर्ण करता येईल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.
यामुळे जर तुमचाही कार घेण्याचा प्लॅन असेल तर बँक ऑफ बडोदा चे कार लोन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की 26 फेब्रुवारी 2024 अर्थात सोमवारी बँक ऑफ बडोदा या प्रमुख पीएसबी ने आपल्या कार लोन वरील व्याजदरात कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.
विशेष म्हणजे हे नवीन दर त्याच दिवसापासून अर्थातच 26 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. बँकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बँकेने कार लोन वरील व्याजदर 0.65 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हणजेच बँकेचे कार लोन वरील व्याजदर 9.4 टक्क्यांवरून थेट 8.75 टक्क्यांवर येऊन ठेपले आहे. एवढेच नाही तर कार लोन साठी आवश्यक असलेले प्रक्रिया शुल्क अर्थातच प्रोसेसिंग चार्जेस देखील बँकेने माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मात्र बँकेची ही ऑफर काही लिमिटेड पिरियड साठी सुरू राहणार आहे. बँकेने सांगितल्याप्रमाणे ही ऑफर 26 फेब्रुवारी ते 31 मार्च 2012 या कालावधीपर्यंत सुरू राहील.
त्यामुळे जर तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा लागणार आहे. बँक ऑफ बडोदा कडून कार लोन वर फ्लॉटिंग आणि निश्चित व्याजदर आकारले जाते. निश्चित व्याजदर हे 8.85% पासून सुरु होत आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही प्रकारच्या कर्ज प्रकारावर ग्राहकांना प्रक्रिया शुल्कापासून सूट देण्यात आली आहे. दरम्यान बँकेकडून दिले जाणारे हे कर्ज अधिकाधिक 84 महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.