40 मिनिटांचा प्रवास आता फक्त 15 मिनिटात, ‘या’ घाटातील बोगद्यामुळे प्रवाशांचा प्रवास झाला सोयीचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Tunnel : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. वेगवेगळ्या महामार्गाची कामे आपल्या महाराष्ट्रात पूर्णत्वास गेली आहेत. काही रस्त्यांची कामे अजूनही सुरू आहेत. यामध्ये मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा देखील समावेश होतो.

समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 km लांबीची असून यापैकी 600 किलोमीटरचे काम देखील पूर्ण झाले आहे. यावर वाहतूक सुद्धा सुरू झाली आहे. दुसरीकडे मुंबई ते गोवा या महामार्गाचे देखील युद्धपातळीवर काम सुरू आहे.

मात्र या महामार्गाचे काम विविध तांत्रिक अडचणींमुळे वेळोवेळी रखडत राहिले आहे. यामुळे या महामार्गांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अजूनही हा संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊ शकलेला नाही.

दरम्यान या महामार्गासंदर्भात अधिक माहिती देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या महामार्गाची एक लेन मे 2024 पर्यंत सुरू होणार असा दावा केला आहे. एवढेच नाही तर हा संपूर्ण महामार्ग डिसेंबर अखेरपर्यंत सर्वसामान्यांच्या सेवेत येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

निश्चितच असे झाल्यास मुंबई ते गोवा असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

तत्पूर्वी मात्र कोकणातील प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या मार्गाचा कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. हा बोगदा एकेरी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की गणेशोत्सवाच्या काळात हा बोगदा एकेरी वाहतुकीसाठी सुरू झाला होता. मात्र गणेशोत्सव झाल्यानंतर हा बोगदा पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद झाला.

मात्र आता येत्या काही दिवसात होळीच्या सणाला सुरुवात होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा बोगदा एकेरी वाहतुकीसाठी पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारपासून हा बोगदा सुरू झाला असून या दोन किलोमीटरच्या बोगद्यामुळे प्रवाशांचा ४० किलोमीटरचा प्रवासा आता फक्त आणि फक्त पंधरा मिनिटात पूर्ण होईल.

कसा आहे बोगद्याचा संपूर्ण मार्ग 

पोलादपूर येथील भोगाव पासून हा बोगदा सुरु होतो आणि खेड मधील कशेडी येथे हा बोगदा समाप्त होतो. याची लांबी एकूण दोन किलोमीटर एवढी असून बोगद्याला लागून असलेले रस्ते धरून हा संपूर्ण मार्ग नऊ किलोमीटरचा आहे. या मार्गामुळे प्रवाशांचा सुमारे 40 ते 45 मिनिटांचा वळसा वाचणार आहे.

दरम्यान या बोगद्याची सिंगल लेन नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. ही लेन झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यना दिलासा मिळालाय. बोगद्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येत आहे.

Leave a Comment