‘या’ 3 बँका देतात सर्वात कमी इंटरेस्ट रेटवर कार लोन ! Car Loan घेण्याआधी एकदा वाचाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Loan Interest Rate : तुम्हीही येत्या काही दिवसात नवीन कार खरेदी करणार आहात का? हो मग आजचा हा लेख तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे. कारण की आज आपण देशातील अशा तीन बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की कमी इंटरेस्ट रेटवर ग्राहकांना कार लोन पुरवत आहेत.

खरेतर अनेकजण ईएमआय वर कार खरेदी करत आहेत. पण, ईएमआयवर कार खरेदी करतांना नेहमी अशा बँकांकडून कार लोन घेतले पाहिजे ज्या की कमी इंटरेस्ट रेट वर कर्ज देतात. याशिवाय प्रोसेसिंग फी देखील तपासली पाहिजे.

कारण की काही बँका कार लोन वर कमी व्याजदर आकरतात मात्र प्रोसेसिंग फी अधिक असते. त्यामुळे कार लोन घेताना प्रोसेसिंग फी आणि व्याजदर यांची तुलना करणे आवश्यक आहे.

अशा परिस्थितीत, आज आपण देशातील अशा तीन बँकांची माहिती पाहणार आहोत ज्या की कमी व्याजदरात अन कमी प्रोसेसिंग फी मध्ये कार लोन ऑफर करत आहेत.

युको बँक : युको बँक कार लोन उपलब्ध करून देत आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कार लोन वर प्रोसेसिंग फि आकारत नाही. बँकेच्या माध्यमातून 8.45% ते 10.55% व्याजदरात कार लोन उपलब्ध करून दिले जात आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया : युनियन बँक ऑफ इंडिया ही पब्लिक सेक्टर मधील एक मोठी बँक आहे. ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 8.70% ते 10.45% या इंटरेस्ट रेट वर कार लोन उपलब्ध करून देत आहे. ही बँक 1000 रुपये प्रोसेसिंग फी आकारते.

कॅनडा बँक : मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडा बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांकडून कार लोन वर 8.70% ते 12.70% व्याज वसूल केले जात आहे. ही बँक प्रोसेसिंग फी म्हणून जेवढी कर्जाची रक्कम असते त्यावर 0.25% किंवा कमाल 2500 रुपयांपर्यंतची प्रोसेसिंग फी आकारते.

Leave a Comment