Car Loan: कार घेण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर 31 मार्च पर्यंत ‘ही’ बँक देत आहे सवलत! स्वस्तात मिळेल कार लोन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Loan:- प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या घरासमोर चार चाकी असावी. परंतु प्रत्येकालाच कार घेणे शक्य होत नाही. कारण कारच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असतात व त्यामुळे बऱ्याच जणांचे हे स्वप्न स्वप्नच राहते. परंतु बरेच व्यक्ती कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्जाचा पर्याय निवडतात.

परंतु कर्ज आले म्हणजे त्याची परतफेड ही आपल्याला करावीच लागते. त्यामुळे प्रत्येक जण कर्ज घेण्या अगोदर आपल्याला स्वस्तामध्ये कर्ज कुठून मिळेल किंवा कोणत्या बँकेच्या माध्यमातून मिळेल याचा प्रत्येक जण विचार करत असतो. आपण जे ही कार लोन घेतो त्यावर आकारला जाणारा व्याजाचा दर याचा फार मोठा प्रभाव हा कर्ज परतफेडच्या एकूण रकमेवर होत असतो.

त्यामुळे आपल्याला कमीत कमी व्याजदरात जर कर्ज मिळाले तर सोयीचे ठरते व कर्ज परतफेड करणे देखील सोपे जाते. अगदी याच मुद्द्याला धरून जर तुम्हाला देखील कार खरेदी करायचे असेल व तुमचा देखील कर्ज घेण्याचा विचार असेल तर बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून तुम्हाला आता कार लोन घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कारण बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून तुम्हाला स्वस्तात कर्ज उपलब्ध होणार आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे बँक ऑफ बडोदाने कार कर्जावरील व्याजदरांमध्ये कपात केली आहे.

 बँक ऑफ बडोदाने कार लोन वरील व्याजदर केले कमी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तुम्हाला देखील कार लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला आता बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून स्वस्तात कर्ज मिळणे शक्य आहे. कारण बँक ऑफ बडोदा ने कार कर्जावरील व्याजदरामध्ये कपात केली असून बँकेच्या माध्यमातून कार कर्जावरील फ्लोटिंग व्याजदरामध्ये तब्बल 0.65 टक्क्यांनी कपात करण्यात आलेली आहे. बँकेचा कार कर्जाचा व्याजदर आता 9.40 टक्क्यांवरून ८.७५% इतका करण्यात आलेला आहे.

विशेष म्हणजे बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून कार लोनचे हे नवीन दर 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्यात आलेले असून ही सवलत मर्यादित कालावधीसाठी आहे. त्यामुळे ज्यांना या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल असे ग्राहक 31 मार्च 2024 पर्यंत या सवलतीचा लाभ घेऊ शकतात.

म्हणजेच तुमच्याकडे अजून एक महिना असून तुम्हाला कार खरेदी करायचे असेल तर बँक ऑफ बडोदा हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. याबाबत बँकेने म्हटले आहे की, हे कार लोन 26 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत फ्लोटिंग व्याजदरावर एक विशेष कालावधीची ऑफर असून हे नवीन व्याजदर नवीन कार खरेदीवर लागू राहणार आहेत.

परंतु यामध्ये लक्षात घेण्याची बाब म्हणजे कर्ज घेणाऱ्याची क्रेडिट प्रोफाइल देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार असून ग्राहकांच्या प्रोफाईलवर देखील कारकर्ज कोणत्या दराने मिळेल हे अवलंबून असणार आहे.

एवढेच नाही तर या फ्लोटिंग व्याजदर पर्यायावर शून्य प्री पेमेंट शुल्काची ऑफर देखील बँकेकडून देण्यात येत आहे. तसेच प्रक्रिया शुल्क निश्चित आणि फ्लोटिंग व्याजदर पर्यायांमध्ये माफ केले आहे. या कर्जाचा कालावधी 84 महिने असणार आहे.

Leave a Comment