Cash Rule In India : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रोकड व्यवहारांऐवजी ऑनलाइन म्हणजे डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे केंद्र शासनाने देखील कॅशलेस इकॉनॉमीला चालना देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकारने कॅशलेस इकॉनॉमीसाठी नागरिकांना प्रोत्साहित केले आहे.
आता पैशांच्या व्यवहारासाठी फोन पे, पेटीएम, गुगल पे, अमेझॉन पे यांसारख्या वेगवेगळ्या एप्लीकेशनचा उपयोग होऊ लागला आहे. त्यामुळे पैशांचे व्यवहार आता आधीच्या तुलनेत सोपे झाले आहे. घरात किंवा खिशात पैसे नसले तरी देखील आता पैशांचे व्यवहार सहजतेने केले जाऊ शकतात.
मात्र असे असले तरी अनेकांना अजूनही कॅशचा व्यवहार आवडतो. यामुळे अजूनही देशात मोठ्या प्रमाणात कॅशचे व्यवहार होत आहेत. ज्या लोकांना इंटरनेट चालवणे जमत नाहीत असे लोक आजही कॅशचा उपयोग करत आहेत.
यामुळे अनेक जण आजही मोठ्या प्रमाणात घरात कॅश ठेवत आहेत. अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून घरात किती कॅश ठेवली जाऊ शकते याबाबत आयकर विभागाचे काय नियम आहेत याविषयी विचारणा होत होती.
दरम्यान आज आपण घरात कॅश ठेवण्याबाबत आयकर विभागाने कोणते नियम तयार केले आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर टॅक्सची चोरी आणि काळे धनची समस्या नियंत्रणात राहावी यासाठी शासनाने अनेक नियम तयार केले आहेत.
यामुळे घरात कॅश ठेवण्याबाबत देखील काही नियम तयार झाले आहेत का याबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. भारतीय आयकर विभागाने घरात कॅश ठेवण्याबाबत कोणताच नियम तयार केलेला नाही. म्हणजेच घरात कॅश ठेवण्यासाठी कोणतीच लिमिट ठरवण्यात आलेली नाही.
भारतीय नागरिक त्याला हवी तेवढी कॅश घरात ठेवू शकतो. त्याच्याकडे जेवढा पैसा असेल तेवढा तो घरात ठेवू शकतो. मात्र असे असले तरी भारतीय नागरिकांना टॅक्स चोरी करण्याचा आणि ब्लॅक मनी स्वतः जवळ बाळगण्याचा कोणताच अधिकार नाहीये.
याचाच अर्थ भारतीय नागरिक त्याला हवी तेवढी कॅश घरात ठेवू शकतो मात्र घरात असलेल्या कॅशचा पुरावा संबंधित व्यक्तीकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा केव्हा तपास यंत्रणेकडून तुमची तपासणी होईल तेव्हा तुम्हाला त्या कॅशचा स्रोत सांगावा लागणार आहे.
तसेच आयटीआर डिक्लेरेशन देखील तपास यंत्रणेला दाखवावे लागणार आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने चुकीच्या मार्गाने पैसे कमावलेले नसतील, त्याच्याकडे घरात जी कॅश पडलेली आहे त्याचा योग्य तो पुरावा असेल तर तो कितीही कॅश घरात ठेवू शकतो. आयकर विभागाकडून किंवा तपास यंत्रणेकडून अशा व्यक्तींवर कोणतीच कारवाई होणार नाही.
मात्र घरात ठेवलेल्या कॅशचा जर पुरावा नसेल तर अशा व्यक्तींवर आयकर विभागाकडून किंवा तपास यंत्रणेकडून कठोर कारवाई होऊ शकते. घरात जी कॅश असेल आणि त्याचा पुरावा संबंधित व्यक्तीकडे नसेल तर अशावेळी संबंधित व्यक्तीकडून जेवढ्या कॅशचा पुरावा नसेल तेवढ्या कॅशवर १३७ टक्के कर आकारला जातो.