Cash Rules : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये कॅशलेस व्यवहाराला अधिक प्राधान्य दिले जात आहे. देशात डिजिटलचा दर्जा वाढत चालला आहे. लोक आता कॅश ऐवजी यूपीआय, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट करण्याला अधिक पसंती दाखवत आहेत. विशेषता यूपीआय आल्यापासून कॅशलेस व्यवहार अधिक प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे.
यूपीआयचा वापर हा खूपच सोपा असल्याने अनेकजण यूपीआय ने पेमेंट करण्याला पसंत दाखवतात. यामुळे मार्केटमध्ये कॅश फ्लो हा कमी झाला आहे. UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहेत.
बहुतांश कामांसाठी केवळ ऑनलाइन व्यवहार होत आहेत. मात्र असे असले तरी आजही असे काही लोक आहेत जे की इंटरनेट फ्रेंडली नाहीयेत आणि यामुळे ते कॅशने व्यवहार करतात.
बरेच लोक आजही एटीएम किंवा बँकेतून पारंपारिक पद्धतीने पैसे काढतात आणि मग कॅशने व्यवहार करतात. यामुळे अनेकांच्या घरात मोठी कॅश असते. परंतु घरात कॅश ठेवण्याचे काही नियम आहेत. या नियमांचे पालन केले नाही तर कारवाई होऊ शकते.
दरम्यान आज आपण घरात कॅश ठेवण्याचे नेमके नियम काय आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरेतर घरात रोकड ठेवण्यासाठी आयकर विभागाने काही नियम तयार केले आहेत.
तुम्ही नियमांचे उल्लंघन केले तर अडचणीत येऊ शकता. काही प्रकरणांमध्ये तर दोषी आढळलेल्या व्यक्तीला तुरुंगात देखील टाकले जाते. त्यामुळे आता आपण घरात कॅश ठेवण्याचे आयकर विभागाचे काय नियम आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तुम्ही घरी किती कॅश ठेवू शकता ?
आयकर विभागाने घरात रोख रक्कम ठेवण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. तुम्हाला हवी तेवढी रोख रक्कम तुम्ही घरी ठेवू शकता आणि त्याद्वारे व्यवहार करू शकता. पण यातील एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.
तुम्ही घरात ठेवलेली कॅश नेमकी कुठून आली आहे याचा पुरावा अवश्य सोबत ठेवला पाहिजे. जर तुमच्या घरात असणारी कॅश कुठून आली आहे याची माहिती तुमच्याकडे नसेल तर अशावेळी आयकर विभागाकडून तुम्हाला अटक केली जाऊ शकते आणि मोठा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
म्हणजेच एखादा व्यक्ती त्याच्या घरात त्याला हवी तेवढी कॅश ठेवू शकतो, त्या व्यक्तीकडे जेवढे पैसे असतील तेवढे तो आपल्या घरात ठेवू शकतो मात्र ते पैसे त्याचे स्वतःचे असायला हवेत आणि त्या पैशांचा त्याच्याकडे प्रूफ असायला हवा.
जर घरात असलेल्या पैशांचा प्रूफ नसेल तर अशावेळी अटक होऊ शकते. एकंदरीत जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पैसे कमावलेले नसतील तर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. तुमच्याकडे जर योग्य इन्कम ऑफ सोर्स असेल तर तुम्हाला Income Tax काहीही करणार नाही.