Caste Validity Certificate Document List : उच्च शिक्षणासाठी, राजकारणात, सरकारी नोकरीत अशा विविध ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट या दोन कागदपत्रांची गरज भासत असते. मात्र ही दोन कागदपत्रे काढताना सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
सामान्यांना हे दोन्ही सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट सादर करावी लागतात, यासाठी अर्ज कुठे करावा लागतो याची फारशी माहिती पाहायला मिळत नाही. त्यामुळे सेतू कार्यालयात एजंटाचा सुळसुळाट पाहायला मिळतो. एजंट लोक सर्वसामान्यांकडून अव्वाच्या-सव्वा रक्कम वसूल करतात आणि हे सर्टिफिकेट काढून देतात.
मात्र जर सर्वसामान्यांना हे सर्टिफिकेट काढण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या कागदपत्रांची गरज भासते आणि यासाठी अर्ज कुठे सादर करावा लागतो याची जर प्राथमिक माहिती असेल तर सर्वसामान्य स्वतः हे सर्टिफिकेट काढू शकतात आणि त्यांना अगदी सहजतेने सर्टिफिकेट मिळणार देखील आहे.
यामुळे सर्वसामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक देखील बऱ्यापैकी थांबणार आहे. म्हणून आज आपण कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आणि कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज भासते आणि यासाठी अर्ज कुठे करावा लागतो याबाबत सविस्तर अशी माहिती घेऊन हजर झालो आहोत.
कास्ट सर्टिफिकेट कसे काढणार
सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की सुरुवातीला कास्ट सर्टिफिकेट काढावे लागते. कास्ट सर्टिफिकेट निघाल्यानंतरच कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट निघते. जर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट बनवायचे असेल तर यासाठी तुम्हाला काही शैक्षणिक पुरावे सादर करावे लागतात.
यामध्ये वंशावळ देखील महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाइन केंद्रांवर जाऊन अर्जदाराला जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो. सेतू सुविधा केंद्रावर देखील जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो.
अर्जदाराने कास्ट सर्टिफिकेटसाठी तहसीलदारांकडे केलेला अर्ज प्रातांधिकाऱ्यांकडून तपासला जातो. अर्ज यथायोग्य असला की मग प्रांत अधिकाऱ्यांच्या सहीने कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट अर्थात जात प्रमाणपत्र दाखला अर्जदाराला वितरित होतो.
अर्ज केल्यानंतर साधारणतः 30 दिवसांच्या कालावधीत कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट अर्जदाराला उपलब्ध होते. १९६७ पूर्वीचा जातीसंबंधीचा पुरावा, अर्जदाराचा रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड, अर्जदाराचा वंशावळ ही कागदपत्रे अर्जदाराला मात्र सादर करावी लागतात.
कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट कसे काढावे
जात प्रमाणपत्र निघाले की मग कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट काढता येते. हे सर्टिफिकेट जात वैधता सिद्ध करते यामुळे प्रत्येक कामासाठी याची गरज असते. शिक्षणापासून ते राजकारणापर्यंत आणि राजकारणापासून तर नोकरीधंद्यापर्यंत सर्व ठिकाणी हे कागदपत्र गरजेचे आहे. हे कागदपत्र काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. www.ccvis maharashtra.com व www.barti.validity.com या संकेतस्थळावर इच्छुक व्यक्तींना अर्ज सादर करता येतो. कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट काढताना मात्र काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
यामध्ये जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, महाविद्यालय किंवा संबंधित कार्यालयाचे पत्र, १५-ए अर्ज, अर्जदारासह कुटुंबातील इतर सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र, नमुना ३ व १७ अर्ज (वंशावळ व कागदपत्रे खरी असल्याची शपथपत्र), अर्जदार व वडिलांचा शाळेचा दाखला, शैक्षणिक पुरावे नसल्यास जातीचा उल्लेख असलेले महसुली पुरावे (खरेदीखत, जन्म-मृत्यू दाखला, सातबारा, फेरफार) इत्यादी कागदपत्रांचा समावेश होतो. दरम्यान जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर साधारणतः 15 ते 90 दिवसात सदर अर्जदाराला कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट मिळत असल्याचा दावा केला जात आहे.