Caste Validity Certificate Online Application : दहावी-बारावीचे निकाल लागले की पालकांची मोठी धावपळ सुरू होते. याचे कारण म्हणजे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची गरज भासत असते. पालक आपल्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्यास मोठी धावपळ करतात.
खरंतर उच्च शिक्षणासाठी एससी, एसटी, ओबीसी, एन टी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सवलतीसाठी कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट अर्थातच जात पडताळणी प्रमाणपत्र देखील लागते. मात्र कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट काढण्यासाठी आतापर्यंत पालकांना मोठी धावपळ करावी लागत असे.
हे कागदपत्र काढण्यासाठी अनेकदा दोन ते तीन महिन्यांचा कालावधी देखील लागत असे. परंतु आता शासनाने कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता अवघ्या काही दिवसातच योग्य अर्जदारांना कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट मिळत आहे.
आता मात्र आठ ते दहा दिवसात विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट उपलब्ध करून दिले जात आहे. काही प्रकरणांमध्ये मात्र दोन ते तीन दिवसांच्या काळातही अर्जदार विद्यार्थ्याला कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट पुरवण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत आज आपण कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट साठी ऑनलाइन पद्धतीने कसा अर्ज करावा लागेल आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याविषयी थोडक्यात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट साठी कोण कोणती कागदपत्रे लागतात?
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना ते ज्या कॉलेजमध्ये शिकत आहेत तेथील चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड लागते, अर्जदाराचे स्कूल लिविंग सर्टिफिकेट, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा, कास्ट सर्टिफिकेट.
अर्जदारांच्या वडिलांच्या शाळेचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा व जातीचा दाखला , अर्जदाराची अत्या व काका यांचे स्कूल लिविंग सर्टिफिकेट, अर्जदाराच्या आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला.
गाव कर पावती, खरेदीखत, फेरफार उतारा, गहाण खत आणि मालमत्ता पत्रक इत्यादी महसुली पुरावे.
वंशावळ नमुना नंबर तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र व यासाठी आवश्यक फॉर्म नंबर 17 (शपथपत्र)
हे पुरावे पण लागतील
या कागदपत्रांसोबतच अर्जदार जर SC कॅटॅगरीतील असेल तर त्याला 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा पुरावा सादर करावा लागतो. तसेच जर अर्जदार VJNT कॅटॅगरीतील असाल तर 21 नोव्हेंबर 1961 पूर्वीचा पुरावा सादर करावा लागतो. तसेच जर अर्जदार OBC व SBC कॅटॅगरीतील असेल तर 13 ऑगस्ट 1967 पूर्वीचा पुरावा कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक राहतो.
ऑनलाईन अर्ज कुठे करणार
कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट काढण्यासाठी https://castevalidity.mahaonline.gov.in/Login/Login या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे विचारलेली सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे.
ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहे. यानंतर तुम्हाला तळाशी पूर्ण वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज क्रमांक मिळेल. यानंतर जे पेज ओपन होईल त्यावर सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. यानंतर मग सेव या बटणावर क्लिक करा. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर कन्फर्म प्रिंट एप्लीकेशन हा पर्याय निवडा.
दिलेला चेक बॉक्स निवडा आणि पूर्ण वर क्लिक करा. तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट होईल आणि तुम्हाला एक सूचना प्राप्त होईल. यां पद्धतीने तुम्ही कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेटसाठी अर्ज करू शकता. अर्ज सादर झाल्यावर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल आणि सर्व यथायोग्य आढळल्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट मिळेल.