ऑक्टोबर महिन्यात कस राहणार हवामान ? यंदा नवरात्रोत्सवात पाऊस पडणार का ? पंजाबरावांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. देशात जून ते सप्टेंबर या काळात मान्सून राहतो. आता सप्टेंबर महिना येत्या चार दिवसात संपणार असून मान्सूनचा परतीचा प्रवास देखील सुरू झाला आहे. 25 सप्टेंबरपासून राजस्थान मधून मानसूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.

पुणे वेधशाळेने 5 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार असा दावा केला आहे. जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाब रावांनी 4 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातील मान्सून माघारी फिरणार असे मत व्यक्त केले आहे.

त्यांनी राजस्थान मधून मान्सून ने परतीचा प्रवास सुरू केला असून आता महाराष्ट्रात चार ऑक्टोबर नंतर मान्सून माघारी फिरेल असे सांगितले आहे. याशिवाय पंजाबरावांनी ऑक्टोबर महिन्यात कस हवामान राहणार याबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच आगामी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

आणखी इतके दिवस महाराष्ट्रात पाऊस बरसणार?

पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एक ऑक्टोबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. यां कालावधीत मात्र महाराष्ट्रात सर्व दूर पाऊस पडणार नाही परंतु भाग बदलत जोरदार पाऊस होणार असे त्यांनी सांगितले.

एक ऑक्टोबर पर्यंत राज्यातील मुंबई, लातूर, नासिक, संपूर्ण कोकण किनारपट्टी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, परभणी, अहमदनगर, नांदेड या भागात चांगला पाऊस पडणार असा पंजाबरावांचा अंदाज आहे. या कालावधीत कोल्हापूर, सांगली, सातारा या प्रमुख द्राक्ष उत्पादक पट्ट्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस देखील पडू शकतो अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

ऑक्टोबर मध्ये कस राहणार हवामान?

राज्यात दोन ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून 5 ऑक्टोबर नंतर राज्यात कडक ऊन पडणार असा अंदाज आहे. मात्र असे असले तरी पुढल्या महिन्यात नवरात्र उत्सवात जोरदार पावसाची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सव साजरा केला जाणार असून या कालावधीमध्ये यावर्षी जोरदार पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. 

Leave a Comment