Cheapest Dry Fruits Market In India : भारतातील अनेक भागात काजू आणि बदामचे भाव आकाशाला गवसणी घालत आहेत. काजू, बदाम तसेच इतर सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याने ड्रायफ्रूट्सचे दररोज सेवन केले गेले पाहिजे असे डॉक्टर सांगतात.
विशेष म्हणजे हे ड्रायफ्रूट्स चवीला देखील खूपच रुचकर असल्याने अनेकांना याचे सेवन करणे आवडते. या ड्रायफ्रूटचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. शिवाय हे ड्रायफ्रूट्स कच्चे देखील खाल्ले जातात. मिठाई मध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
भारतीय स्वयंपाक घरात काजू बदाम असतोच. मात्र काजू आणि बदामचे भाव बाजारात 1000 रुपये प्रति किलोपासून सूरु होतात. पण भारतात असेही एक मार्केट आहे, असेही एक ठिकाण आहे जिथे काजू आणि बदाम फक्त आणि फक्त 30 ते 40 रुपये प्रति किलोने मिळतात.
यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र ही गोष्ट खरी आहे. भारतात असे एक ठिकाण आहे जिथे मुबलक प्रमाणात हे ड्रायफ्रूट्स उत्पादित केले जातात आणि यामुळे त्या ठिकाणी या ड्रायफ्रूटचे भाव खूपच कमी असतात.
कुठे मिळतात स्वस्त काजू अन बदाम ?
मीडिया रिपोर्ट नुसार भारतात सर्वात स्वस्त काजू अन बदाम झारखंडमध्ये मिळतात. झारखंड येथील जामतारा या भागात काजू खूपच स्वस्तात मिळतो. या शहराला काजूचे शहर म्हणून ओळखले जाते.
झारखंड राज्यात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. खरे तर महाराष्ट्रातील कोकण विभागात देखील काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. पण कोकणात काजूवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग आहेत.
यामुळे येथे कारखानदारांकडून काजूची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते आणि कारखानदार कोकणातील शेतकऱ्यांकडून समाधानकारक बाजार भावात काजू बी खरेदी करतात. परिणामी कोकणात काजू स्वस्त मिळत नाही. दुसरीकडे झारखंडमध्ये हजारो टन काजूचे उत्पादन होते.
येथे मोठ्या प्रमाणात काजूच्या बागा पाहायला मिळतात. झारखंड राज्यातील जामतारा व्यतिरिक्त दुमका आणि संथाल परगणा या भागात सुद्धा काजूची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
जामतारा येथील नाला गावात तर सुमारे 50 एकर क्षेत्रात काजूची लागवड केली जात आहे. पण या ठिकाणी कोणताही प्रक्रिया उद्योग नाही. यामुळे येथील लोक स्वस्तात काजू विकतात.
जामतारा येथे रस्त्याच्या कडेने अनेक लोक तीस ते चाळीस रुपये प्रति किलोने काजू विकत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. प्रक्रिया उद्योग नसल्याने येथे काजू, बदाम स्वस्त मिळतात पण यामुळे येथील काजू उत्पादक शेतकऱ्यांना शेतीमधून फारसा नफा मिळत नाहीये.