रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्रात सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील ‘या’ 17 रेल्वे स्थानकावर थांबणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे संपूर्ण देशभरातील पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्ट्या लागल्याने आता विद्यार्थी आपल्या गावाकडे परतत आहे. पर्यटक पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहेत. शिवाय सध्या लग्नाचा हंगाम सुरू असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतेय.

राज्यातून धावणाऱ्या विविध रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी होत असून ही अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उन्हाळी विशेष गाड्या देखील चालवल्या जात आहेत.

अशातच कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राजधानी मुंबईहून कोकणात एक विशेष उन्हाळी गाडी चालवली जाणार आहे.

या गाडीच्या एकूण 16 फेऱ्या होणार असून यामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. ही विशेष गाडी राजधानी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी दरम्यान चालवली जाणार आहे.

विशेष म्हणजे या उन्हाळी विशेष गाडीला राज्यातील 17 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं राहणार वेळापत्रक ?

कोकण रेल्वे ही 22 डब्यांची उन्हाळी विशेष गाडी 18 एप्रिल 2024 ते 7 जून दरम्यान चालवणार आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या काळात मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ही गाडी दर गुरुवारी सोडली जाणार आहे.

ही गाडी रात्री सव्वा दहा वाजता रवाना होणार आहे अन दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी थिवी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार 

कोकण रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही गाडी या रेल्वे मार्गावरील सतरा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

यात ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी या स्थानकांचा समावेश आहे.

Leave a Comment