3 वर्षाच्या एफडीवर कोणत्या बँका देताय सर्वाधिक व्याज ? पहा संपूर्ण यादी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD News : तुम्हीही तुमच्याकडील पैसा एफडी मध्ये गुंतवण्याचा तयारीत आहात का ? हो, ना मग आजची बातमी तुमच्यासाठी खूप कामाची ठरणार आहे. खरेतर फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेत अलीकडे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

याचे कारण म्हणजे आता मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना देखील चांगला परतावा मिळत आहे. बँकेच्या माध्यमातून एफडी साठी आता चांगले व्याज ऑफर केले जात आहे.

यामुळे गुंतवणूकदारांचा माईंडसेट आता बदलू पाहत आहे आणि FD करण्याला पसंती दाखवली जाऊ लागली आहे. महिला गुंतवणूकदार देखील आता मुदत ठेव योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे चित्र आहे.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुदत ठेव योजनेवर चांगले रिटर्न मिळत आहेत यामुळे सध्याचा कालावधी हा मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल आहे.

दरम्यान आज आम्ही आपल्या वाचक मित्रांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर कोणत्या बँका सर्वाधिक व्याज ऑफर करत आहेत याविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत.

तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका खालील प्रमाणे

SBM Bank : ही बँक सामान्य ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर 8.10% आणि जेष्ठ ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर 8.60% म्हणजेच 0.50% अधिकचे व्याज देत आहे.

DCB Bank : आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही देखील बँक तीन वर्षांच्या एफडी साठी चांगले व्याज देते. बँक तीन वर्षे कालावधीच्या Fix Deposit साठी सामान्य ग्राहकांना आठ टक्के आणि ज्येष्ठ ग्राहकांना 8.50% व्याज देत आहे.

Yes Bank : प्रायव्हेट सेक्टर मधील येस बँक देखील आपल्या ग्राहकांना चांगले व्याज देते. 3 वर्षांच्या एफडी साठी ही बँक सामान्य ग्राहकांना 7.75 टक्के आणि ज्येष्ठ ग्राहकांना 8.25 टक्के व्याज देत आहे. 

इंडसइंड बँक : जर तुम्हाला तीन वर्षांसाठी एफडी करायची असेल तर या देखील बँकेचा पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तीन वर्षे कालावधीच्या एफडी साठी सामान्य ग्राहकांना 7.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना आठ टक्के एवढे व्याज ऑफर करत आहे.

Leave a Comment