तुमच्या स्वप्नातील घर बांधताय; मग सर्वात स्वस्त होम लोन देणारी बँक कोणती ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cheapest Home Loan Bank : आपल्यापैकी अनेकांचे नवीन घर बांधण्याचे स्वप्न असेल. काही लोकांनी नुकतेच नवीन घर तयार केले असेल तर काही लोक नवीन घरासाठी आजही मेहनत घेत असतील.

खरे तर अलीकडे घर बांधणे खूपच महाग झाले आहे. वाढती महागाई आणि बिल्डिंग मटेरियल चे वाढलेले दोर या सर्व पार्श्वभूमीवर घर बांधण्यासाठी आता अधिकचा खर्च करावा लागत आहे.

अशा परिस्थितीत अनेकजण आता होमलोन घेऊन स्वप्नातील घर बांधत आहेत. जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे.

होम लोन घेण्यापूर्वी सर्वप्रथम या कर्जासाठी आकारले जाणारे व्याजदर पाहिले जाते. ज्या बँका स्वस्तात होम लोन देतात त्याच बँकेकडून कर्ज घेणे फायदेशीर ठरते.

यामुळे अनेकांच्या माध्यमातून कोणती बँक कमी व्याजदरात होम लोन देत आहे याविषयी विचारणा होत होती. अशा परिस्थितीत आज आपण सर्वात स्वस्त होम लोन देणाऱ्या बँकांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

स्वस्त होम लोन देणाऱ्या बँका कोणत्या ?

स्टेट बँक ऑफ इंडिया : SBI ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचे करोडो खातेधारक आहेत. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असते.

एसबीआय आपल्या ग्राहकांना सवलतीच्या दरात गृह कर्ज देखील उपलब्ध करून देते. एसबीआयच्या होम लोन च्या व्याजदराबाबत बोलायचं झालं तर ही बँक गृहकर्जावर ग्राहकांकडून ८.६० टक्के आणि ९.४५ टक्के दराने व्याज वसूल करत आहे.

पण हे गृहकर्जाचे व्याज अनेक घटकांवर अवलंबून असते. यामध्ये कर्जाची रक्कम, कालावधी, कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर आणि घेतलेल्या गृहकर्जाचा प्रकार यांचा समावेश होतो.

पंजाब नॅशनल बँक : PNB ही देखील देशातील एक प्रमुख बँक आहे. ही बँक देखील आपल्या ग्राहकांना गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना 8.40 टक्के आणि 10.60 टक्के प्रतिवर्ष दराने गृहकर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे जर तुम्हालाही गृह कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही या बँकेकडून कर्ज घेऊ शकता.

HDFC बँक : ही खाजगी क्षेत्रातील देशातील एक मोठी बँक आहे. या बँकेचेही तुम्हाला लाखो खातेधारक पाहायला मिळतील. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असते आणि स्वस्तात वेगवेगळे कर्ज उपलब्ध करून देते. HDFC बँक ग्राहकांना गृह कर्ज देखील पुरवत आहे. ही बँक गृह कर्जासाठी वार्षिक 8.50 टक्के ते 9.40 टक्के दराने व्याज वसूल करत आहे.

Leave a Comment