Cheapest Home Loan : आपल्यापैकी अनेकांचे आपले स्वतःचे, हक्काचे एक घर असावे असे स्वप्न असेल. असे घर जिथे आपले उर्वरित आयुष्य मनमुरादपणे जगता यावे. मात्र अलीकडे घर बनवणे सोपी बाब राहिलेली नाही. घरांच्या किमती दिवसेंदिवस विक्रमी वाढत आहेत. वाळू, विटा, सिमेंट यासह लोखंडाचे भाव विक्रमी वाढले असल्याने घर बनवणे आता महाग झाले आहे.
हेच कारण आहे की आता घर बनवण्यासाठी होम लोन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. स्वप्नातल्या घरासाठी अनेक लोक गृह कर्जाचा पर्याय स्वीकारत आहेत. विशेष असे की रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक आता लोकांना गृह कर्ज घेऊन घर बांधणे वाईट नसल्याचे सांगत आहेत. म्हणजेच गृह कर्ज घेऊन घर उभारणे हे काही प्रसंगी फायदेशीर देखील ठरते.
दरम्यान तुम्हीही या सणासुदीच्या हंगामात, दिवाळीच्या काळात नवीन घर घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. विशेषता होम लोन घेऊन आपले घराचे स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी ही बातमी खास राहणार आहे. त्यातल्या त्यात ज्या लोकांचा सिबिल स्कोर हा चांगला आहे अशा लोकांसाठी ही आनंदाची बातमी राहणार आहे.
ज्यांचा CIBIL स्कोर चांगला स्ट्रॉंग आहे म्हणजे 750 पेक्षा जास्त आहे अशा लोकांना आता कमी व्याजदरात गृह कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना लवकरात लवकर होम लोन मंजूर होत असते. दरम्यान, आज आपण ज्या लोकांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक आहे अशा लोकांना कोणत्या बँका कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून देत आहेत याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयचा गौरव केला जातो. एसबीआयची ग्राहक संख्या पाहता ही देशातील सर्वात मोठी बँक ठरते. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना सुरू करत असते. गृह कर्ज घेणाऱ्या लोकांसाठी देखील या बँकेच्या माध्यमातून काही कौतुकास्पद योजना राबवल्या जातात. महिलांसाठी देखील ही बँक विविध योजना चालवते. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्ही एसबीआय बँकेचे होम लोन घेऊ शकता.
सिबिल स्कोर चांगला असेल तर बँकेच्या माध्यमातून लवकरच होम लोन मंजूर होते. ही बँक सध्या ८.६ टक्के ते ९.६५ टक्के वार्षिक व्याजदराने गृहकर्ज देत आहे. तुमचा CIBIL स्कोअर 750 अधिक असेल तर तुम्हाला 8.6 टक्के दराने कर्जही मिळू शकते. CIBIL स्कोअर 700-749 च्या दरम्यान असलेले लोक 8.7 टक्के वार्षिक व्याजदराने गृहकर्ज घेऊ शकतात. हे व्याजदर सामान्य व्याजदरापेक्षा जवळपास 55-65 बेसिस पॉइंट्सने कमी आहे. निश्चितच ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे अशा लोकांसाठी एसबीआयचे होम लोन फायदेशीर ठरणार आहे.
आयसीआयसीआय बँक : खाजगी क्षेत्रातील ICICI ही देखील एक देशातील नामांकित बँक आहे. या बँकेचे ही लाखो खातेदार आहेत. ही बँक देखील आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना राबवते. मिळालेल्या माहितीनुसार पगारदार लोकांना ही बँक 35 लाखांपर्यंतच्या होम लोन साठी 9.25 टक्के ते 9.65 टक्के या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते. तसेच स्वयंरोजगार असलेल्या लोकांसाठी ही बँक 9.40 टक्के ते 9.80 टक्के या दरात गृहकर्ज उपलब्ध करून देते.
तसेच पगारदार लोकांना 35 ते 75 लाखाच्या गृहकर्ज हवे असेल तर ही बँक 9.5-9.8 टक्के या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते. तसेच स्वयंरोजगार असलेल्या लोकांना जर 35 ते 75 लाखांपर्यंतचे होम लोन घ्यायचे असेल तर 9.65 ते 9.95 टक्के वार्षिक व्याजदरावर ही बँक होम लोन उपलब्ध करून देते. पण जर ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज हवे असेल तर पगारदार लोकांना ९.६ – ९.९ टक्के एवढे व्याजदर लागेल आणि स्वयंरोजगार असलेल्या लोकांना ९.७५ – १०.०५ टक्के एवढे व्याजदर द्यावे लागेल. जर सिबिल स्कोर चांगला असेल तर ही बँक देखील ताबडतोब कर्ज मंजूर करते.
या बँका देखील देतात स्वस्तात होमलोन
एचडीएफसी हे देशातील आणखी एक खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची आणि मोठी बँक आपल्या ग्राहकांसाठी कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देते. 8.75 ते 9.40 % या व्याजदरात एचडीएफसी कडून होम लोन पुरवले जाते. कोटक महिंद्रा बँक देखील स्वस्तात होम लोन पुरवते. याशिवाय बँक ऑफ बडोदा देखील आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात होम लोन पुरवते. ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो अशा लोकांना थोड्याशा कमी व्याजदरात या बँका गृहकर्ज देतात.