हायवे आणि एक्सप्रेस वे मध्ये काय फरक असतो ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Highway And Expressway : देशात सध्या वेगवेगळ्या महामार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. आपल्या राज्यातही विविध महामार्गाची कामे सध्या सुरू असून या महामार्गाची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. राज्यात समृद्धी महामार्ग विकसित केला जात असून या महामार्गाचे जवळपास निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दरम्यान हा मार्ग विकसित केला जात आहे.

या मार्गाला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणून ओळखले जात आहे. सध्या स्थितीला मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे नागपूर ते भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते भरविर हे सहाशे किलोमीटरचे अंतर बांधून तयार झाले असून यावर सध्या स्थितीला वाहतूक सुरू आहे. भरवीर पासून मुंबई पर्यंतचा राहिलेला भाग देखील लवकरात लवकर पूर्ण केला जाणार आहे.

संपूर्ण समृद्धी महामार्ग डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे. मात्र अशा स्थितीत हायवे आणि एक्सप्रेस वे यामधील फरक काय असा प्रश्न काही लोकांकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर जाणून घेणार आहोत. द्रुतगती मार्ग म्हणजेच एक्सप्रेस वे हा उच्च स्तराचा मार्ग असतो. एक्सप्रेस वे हा प्रामुख्याने 6 आणि 8 लेनचा असतो.

जलदगती वाहतुकीसाठी एक्सप्रेस वे म्हणजे द्रुतगती मार्ग बांधले जातात. एक्सप्रेस वे वर टू व्हीलर तसेच कमी गतीच्या वाहनांना परवानगी नसते. एक्स्प्रेस वे साठी स्वतंत्र एन्ट्री पॉईंट आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र रॅम्प बनवले जातात. म्हणजे एक्सप्रेस वे वर चढण्यासाठी तसेच करण्यासाठी स्वातंत्र इंट्री आणि एक्झिट पॉईंट असतात. ज्याद्वारे तुम्ही मार्गांवर चढू शकता किंवा बाहेर पडू शकता.

एक्सप्रेस वे दोन ठिकाणांमधील किंवा शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी बांधले जातात. हायवे दोन गावांना किंवा दोन शहरांना जोडण्यासाठी बांधले जातात. हायवे प्रामुख्याने दोन लेन किंवा चार लेनचे असतात. हायवेवर चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी स्पेशल एन्ट्री किंवा एक्झिट पॉईंट नसतात. हायवे वर टू व्हीलर वाहनांना देखील परवानगी असते. हायवेवर इतर कमी गतीचे वाहन देखील जाऊ शकतात.

Leave a Comment