Cotton Crop Fertilizer Management : महाराष्ट्रात कापूस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. या पिकाची मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते.
खरंतर, राज्यातील बहुतांशी भागात कापूस पिकाची लागवड झाली आहे. काही शेतकऱ्यांनी कापूस पिकाला खताचा पहिला डोस देखील दिला असेल. पण काही भागात अजूनही कापसाची लागवड झालेली नाही.
दरम्यान आज आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस पिकासाठी खताचा पहिला डोस कोणता दिला पाहिजे या महत्वपूर्ण अशा बाबीविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे जर तुम्ही अजूनही कापूस लागवड केलेली नसेल किंवा खताचा पहिला डोस दिलेला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
तसेच जर तुम्ही खताचा पहिला डोस दिलेला असेल तरी देखील ही बातमी नक्कीच वाचा जेणेकरून तुम्ही तुमच्या पिकाला कोणते खत दिले आहे ते खत योग्य आहे का? याची माहिती तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
कापूस पिकासाठी खताचा पहिला डोस कोणता द्यावा?
1)डीएपी एक बॅग + पोटॅश एक बॅग किंवा
2) 10 26 26 दोन बॅग
3) सिंगल सुपर फॉस्फेट तीन बॅग + पोटॅश एक बॅग
4) 12 32 16 किंवा 14 35 16 यापैकी कोणतीही एक बॅग + पोटॅश 25 किलो
वर दिलेल्या चार पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्यायाचा शेतकरी बांधव वापर करू शकतात. वर दिलेल्या चार ऑप्शनपैकी कोणत्याही एका ऑप्शनच्या खताचा कापूस पिकाला पहिला डोस दिला जाऊ शकतो.
इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की, वर दिलेले प्रमाण हे एक एकर क्षेत्रासाठी आहे. तसेच शेतकरी बांधव या चार पर्यायात जर त्यांच्या कापूस पिकात गोगलगाय तसेच पैसा कीटकांचा प्रादुर्भाव असेल तर कारटॉप हायड्रोक्लोराइड पाच किलो एकरी या प्रमाणात देऊ शकतात.
तसेच कापूस पिकाचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी पाच किलो ह्यूमिक ऍसिड देखील वर दिलेल्या पर्यायात ऍड केले जाऊ शकते. मात्र हे दोन्ही ऑप्शनल राहणार आहेत म्हणजेच शेतकरी बांधव याचा वापर करूही शकतात किंवा नाही जरी केला तरी चालनार आहे.