Cotton Farming In Maharashtra : मे महिन्याचा पहिला पंधरवाडा आता लवकरच संपणार आहे. यानंतर शेतकऱ्यांना कापसाचे बियाणे मिळणार आहेत. यावर्षी अर्थातच खरीप 2024 साठी 16 मे 2024 पासून कापूस बियाणे विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. अर्थातच येत्या काही दिवसात शेतकऱ्यांची कापूस पेरणीसाठी लगबग सुरू होणार आहे.
मात्र यंदा कोणत्या कापसाच्या वाणाची निवड करायची, हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. खरे तर यंदा मान्सून काळात चांगला पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
परिणामी यावर्षी कापूस लागवड वाढणार असून कापसाच्या उत्पादनात देखील वाढ होणार आहे. तथापि शेतकऱ्यांना कापसाच्या सुधारित जातींची लागवड करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण कापसाच्या टॉप 3 जातींची माहिती जाणून घेणार आहोत.
जंगी :- मिळालेल्या माहितीनुसार कपाशीची ही जात कोरडवाहू आणि बागायती भागात लागवडीसाठी उपयुक्त. या जातीचे पीक 150 ते 160 दिवसात परिपक्व होते.
या जातीचा कापूस वेचणीला सोपा असल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यातील हवामान या जातीसाठी अनुकूल आहे. राज्यातील अनेक भागात या जातीची लागवड होत आहे.
मनी मेकर :- कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मनी मेकर ही जात शेतकऱ्यांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. याची बागायती आणि कोरडवाहू भागात लागवड करता येणे शक्य आहे. 150 ते 160 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनत असल्याची माहिती समोर आली आहे.
धनदेव प्लस :- कमी फवारण्यांमध्ये जास्तीचे उत्पादन ही या जातीची सर्वात मोठी विशेषता आहे. या जातीची लागवड केल्यास फक्त तीन ते चार फवारण्याची गरज भासणार आहे. या जातीचे पीक 130 ते 160 दिवसात परिपक्व होते.
या जातीचा कापूस वेचायला सोपा जातो. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये याची लागवड होत आहे. मराठवाडा, विदर्भ अन खानदेश या प्रमुख कापूस उत्पादक विभागात याची लागवड पाहायला मिळते.