तारीख ठरली ! PM किसानचा 16वा हफ्ता ‘या’ महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार, कसा घेणार योजनेचा लाभ ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana Details : देशातील शेतकऱ्यांचा उत्थानासाठी केंद्रातील मोदी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. पीएम किसान ही देखील अशीच एक योजना आहे. ही स्कीम दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक आहे. पीएम किसानची सुरुवात 2019 मध्ये झाली असून तेव्हापासून आजतागायत ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे.

शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. पण हे 6000 रुपये एक टप्प्यात न देता टप्प्याटप्प्याने पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक तीन हफ्त्यामध्ये या योजनेचा पैसा शेतकऱ्यांना मिळत आहे.

आतापर्यंत एकूण 15 हप्ते पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. पीएम किसानचा 14 वा हफ्ता 27 जुलै 2023 रोजी आणि पंधरावा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. मागील हफ्ता छत्तीसगड येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बटन दाबून देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता.

आपल्या राज्यातील जवळपास 85 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा पंधरावा हप्ता मिळाला आहे. दरम्यान आता या योजनेचा सोळावा हप्ता केव्हा येणार हा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. अशातच आता या योजनेच्या पुढील हप्त्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

केव्हा जमा होणार 16 वा हफ्ता
या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता पाठवला जातो. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात पंधरावा हप्ता मिळाला असल्याने आता सोळावा हप्ता फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीत केव्हाही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती समोर येत आहे.

तथापि सोळाव्या हफ्त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाहीये. पण लवकरच ही तारीख अंतिम होईल आणि शेतकऱ्यांना योजनेच्या पुढील हफ्त्याचा पैसा दिला जाईल असे सांगितले जात आहे.

पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करणार
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यासाठी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. मग वेबसाईटवर असलेल्या फार्मर्स कॉर्नर या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय

सिलेक्ट करायचा आहे. मग रुरल फार्मर रजिस्ट्रेशन किंवा अर्बन फार्मर रजिस्ट्रेशन यापैकी तुमचा जो योग्य पर्याय असेल तो सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर तुम्ही रुरलं फार्मर सिलेक्ट करायचे आहे. तसेच जर तुम्ही

शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला अर्बन फार्मर रजिस्ट्रेशन हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे.

मग तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक, 10 अंकी मोबाइल क्रमांक टाकायचा आहे.
एवढे केल्यानंतर मग तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. मग गेट ओटीपीवर क्लिक करायचे आहे.

एवढे केले की तुम्ही एन्ट्री केलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल.
आता तुमच्या मोबाईलवर आलेला तो OTP तुम्हाला दिलेल्या रकान्यात प्रविष्ट करायचा आहे. एवढ केल्यानंतर आता

तुम्हाला अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायचे आहे. यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. जमिनीची माहिती देखील येथे तुम्हाला सादर करायची आहे.

ही सर्व माहिती भरून झाली की मग तुम्हाला आधार पडताळणी करावी लागेल.
तुम्हाला काही कागदपत्रे सुद्धा अपलोड करावी लागणार आहेत.

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे. एवढे केल्यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

Leave a Comment