Health News : सध्या उन्हाळ्याच्या कालावधी चालू झाला असून मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे व वातावरणात कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत असल्याने आता अंगाची लाही लाही करणारा उकाडा सर्वीकडे जाणवत आहे.
त्यामुळे साहजिकच या कालावधीमध्ये आपली पावले वेगवेगळ्या फळांच्या ज्यूस सेंटर कडे वळतात व आपण थंडगार ज्यूस मोठ्या प्रमाणावर पीत असतो. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये उसाचा रस खूप जास्त प्रमाणामध्ये सेवन केला जातो आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील उसाचा रस खूप फायदेशीर आहे.
कारण उसाच्या रसामध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स आणि आयर्न मोठ्या प्रमाणावर असते व त्यासोबतच मॅग्नेशियम व कॅल्शियम देखील असते. उसाचा रस पिला तर पोटाच्या संबंधित काही समस्या असतील तर त्या देखील निर्माण होत नाहीत.
तसेच शरीराला गारवा देण्याच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा असून उन्हाळ्याच्या कालावधीत शरीरामध्ये डीहायड्रेशनची समस्या देखील येत नाही. परंतु उसाचा रस पिण्याची योग्य वेळ देखील माहित असणे खूप गरजेचे आहे. याबाबत काही सुप्रसिद्ध तज्ञांनी याचा रस कधी व कसा प्यावा याबद्दल माहिती दिलेली आहे व ते आपण या लेखात बघणार आहोत.
उसाचा रस कधी प्यावा?
उसाचा रस शरीराला खूप फायदेशीर असून तो योग्य वेळी पिणे खूप गरजेचे आहे तरच फायदा मिळतो. उसाचा रस दुपारी किंवा दुपार होण्याच्या आधी पिणे गरजेचे आहे. तसेच तो पिताना उभे राहून न पिता बसून पिणे गरजेचे आहे. आठवड्यातून तीन ते चार वेळा उसाचा रस पिला तर शरीराला गारवा मिळतो व त्यामुळे डीहायड्रेशनची समस्या देखील उद्भवत नाही. तसेच उसाचा नेहमी ताजा रसच प्यायला हवा व फ्रिजमध्ये ठेवलेला उसाचा रस पिऊ नये. तसेच थंड बराच वेळ वर काढून ठेवलेला रस पिला तर पचनक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. चव आणि पोषक तत्त्व वाढवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये पुदिना आणि लिंबाचा रस मिक्स करू शकता. उसाचा रस पिल्यामुळे शरीराला गारवा मिळतो.
या लोकांनी उसाचा रस पिणे टाळावे
ज्या व्यक्तीला खोकला किंवा सर्दीचा त्रास असेल त्यांनी उसाचा रस पिऊ नये. तसेच डोकेदुखीचा त्रास असेल तरीदेखील त्यांनी उसाचा रस पिणे टाळावे. कारण उसाच्या रसाचा थंड प्रभावामुळे डोकेदुखी जास्त वाढते.
उसाचा रस हा पचनक्रियेसाठी खूप चांगला असतो परंतु जास्त प्रमाणामध्ये सेवन केले तर पचनक्रियेवर देखील चुकीचा परिणाम होऊ शकतो. जर शरीरामधील कोलेस्टेरॉल वाढले असेल तरी उसाचा रस पिणे टाळणे गरजेचे आहे.