Milk Increase Tips : गाई व म्हशींचे दूध काढताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी! दूध व्यवसायामध्ये येईल पैसाच पैसा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Milk Increase Tips :- पशुपालन व्यवसाय मध्ये मोठ्या प्रमाणावर गाई व म्हशींचे पालन केले जाते व या माध्यमातून मिळणारे दुधाचे उत्पादन हा शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असतो. गाई व म्हशीचे आहार व्यवस्थापन तसेच आरोग्य व्यवस्थापन इत्यादी गोष्टी दूध उत्पादनावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असतात.

त्यामुळे व्यवस्थापनामध्ये कुचराई न करता उत्तम व्यवस्थापन ठेवून दुधाचे उत्पादन वाढवता येते. परंतु त्यासोबतच दुभत्या जनावरांचे दूध काढताना देखील काही काळजी घेणे खूप गरजेचे असते. परंतु दुभत्या जनावरांची धार काढणे म्हणजे दूध काढणे याच्यामध्ये देखील एक शास्त्र आहे.

बऱ्याचदा परंपरागत पद्धतीने म्हणजेच आपण हाताने दूध काढतो किंवा मिल्किंग मशीनचा देखील आता वापर केला जातो. गाईंच्या बाबतीत पाहिले तर दूध काढताना आपण ज्या प्रकारची गाईला सवय लावतो अगदी तसेच सवय गाईला देखील लागते. गाईचे दूध काढताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते. यासंबंधीचेच माहिती आपण या लेखात बघू.

जनावरांचे दूध काढताना ही काळजी घ्या

1- तुमची दूध काढण्याची दररोजची जी वेळ असेल ती कटाक्षाने पाळणे खूप गरजेचे आहे. तसेच दूध काढण्यापूर्वी कमीत कमी अर्धा तास गोठा झाडून साफ करून घ्यावा व गव्हाणी मध्ये प्रत्येक गाईचे खाद्य भरडा म्हणजेच आंबवण टाकून तयारच ठेवावे.

2- गाईला नेहमी माया ममतेने हाताळावे व तिच्या सभोवती आवाज किंवा आरडाओरड असेल तर ती टाळावी. दूध काढण्या अगोदर गाईचे कास स्वच्छ चोळून धुवून घ्यावी व त्यासोबतच शेपटी तसेच कास व पोटाजवळचा भाग देखील स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. हिवाळा असेल तर कोमट पाण्याचा याकरिता वापर करावा व यामध्ये थोड्या प्रमाणात पोटॅशियम परमॅग्नेट टाकून घ्यावे.

3- तसेच कास कोरडी करताना ती सडाच्या टोकापासून करावी व प्रत्येक गाईला वेगवेगळे कापड कास स्वच्छ करण्यासाठी वापरावा. तसेच पुन्हा त्याच फडक्याचा वापर करायचा असेल तर ते स्वच्छ धुऊन उन्हात वाळवून मगच वापर करावा.

4- दूध काढताना गाईला इजा न होता ते वेगाने काढले जाईल अशा पद्धतीने काढावे व असे केल्याने कास रिकामी होऊन अधिक दूध मिळते. कासेला धुण्यापासून तर कोरडी करणे व धार काढणे या गोष्टी सात ते आठ मिनिटांमध्ये संपणे गरजेचे आहे. जेव्हा दूध काढले जाते तेव्हा दूध काढताना गाईने पान्हा सोडण्याकरता तिच्या रक्तात जे द्रव्य असते त्याचा परिणाम हा सात ते आठ मिनिटांचा असतो व त्याच वेळी गाय पान्हवते व नंतर हे प्रमाण कमी होते.

5- दुध काढताना हाताची बोटे व तळवा यामध्ये सड धरून दाबून काढावे. याकरिता अंगठा तळव्यामध्ये दुमडू नये. असं केले तर सडाला इजा होण्याची शक्यता असते. दूध काढताना सडाला पाणी, तेल व दूध लावणे घातक आहे. असे केले तर सडामध्ये रोगजंतू शिरण्याची शक्यता वाढते.

6- ज्या गाई दिवसातून 13 ते 15 लिटर दूध देतात त्यांना दिवसातून दोनदा पिळावे. त्या तुलनेत ज्या गाई दिवसातून 15 लिटरपेक्षा अधिक दूध देतात त्यांना दिवसातून तीनदा पिळावे. दोन पिळण्यामधील म्हणजे दोन वेळच्या दूध काढण्यामधील अंतर हे सोळा तासांपेक्षा जास्त असू नये.

7- दूध काढण्याच्या वेळेला ज्या गाई ताज्या व्यालेल्या आहेत यांचे अगोदर दूध काढावे व ज्या गाईंना तीन महिन्यापेक्षा जास्तीचा कालावधी झाला असेल त्यांचे नंतर दूध काढावे.

8- बऱ्याचदा काही पशुपालक शेतकऱ्यांकडे दूध काढण्यासाठी एकच व्यक्ती असते व त्यामुळे त्या व्यक्तीचे सवय गाईंना होते. जर एखाद्या घरगुती कारणामुळे किंवा कशामुळे तो व्यक्ती एखाद्या दिवशी आला नाही तर त्याच्यामुळे गाईंचे दूध देण्यावर परिणाम होऊन दूध कमी होते.

9- तसेच जे व्यक्ती गाईंचे दूध काढते त्यांनी त्याच्या हाताची नखे काढून घेणे गरजेचे आहे किंवा त्या व्यक्तीला काही संसर्गजन्य आजार तर नाही ना हे देखील पाहणे महत्वाचे आहे.

10- समजा तुमच्या गोठ्यामध्ये 20 ते 30 गायी आहेत व बऱ्याच गाई पंधरा लिटर पेक्षा जास्त दूध देणारे आहेत तर रोजंदारी माणूस बघण्यापेक्षा अशावेळी यंत्राने दूध काढण्याचे सोय करावी.

Leave a Comment