Drone Didi Scheme:- केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून अशा घटकांना सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून त्यांचा विकास व्हावा व रोजगाराच्या संधी निर्माण होऊन आर्थिक स्वावलंबी व्हावेत त्यामागचा प्रमुख उद्देश.
त्यासोबतच जर आपण महिलांचा विचार केला तर महिलांचे सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून महिलांना विविध क्षेत्रांमध्ये सहभागी होता यावे याकरिता देखील महिलांसाठी अनेक योजना सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून सरकार राबवत आहे.
महिलांसाठी असलेल्या अशा अनेक योजनांच्यामध्ये जर आपण पाहिले तर सध्या नमो ड्रोन दीदी योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेकरिता 500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
म्हणजेच मागच्या वर्षीचा या योजनेसाठी ची तरतूद पाहिली तर त्या तुलनेमध्ये यावर्षी 2.5 पट अधिक तरतूद करण्यात आलेली आहे. मागच्या वर्षी या योजनेकरिता 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती.
या योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण हा प्रमुख उद्देश आहेच परंतु त्यासोबतच कृषी क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढावी हा एक महत्वपूर्ण उद्देश असून त्यामुळेच ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे या योजनेचे स्वरूप व फायदा कोणाला मिळेल? यासंबंधीची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
नमो ड्रोन दीदी योजना केव्हा सुरू करण्यात आली?
तर आपण या योजनेचा विचार केला तर ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 या वर्षी सुरु केलेली योजना असून या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये देशातील एक लाख महिलांना ड्रोन चालवण्याचे ट्रेनिंग दिले जाणार आहे व ही योजना देशातील कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत जे काही महिलांना ट्रेनिंग दिले जाणार आहे त्यामध्ये ड्रोन उडवण्यापासून तर प्राप्त झालेल्या डेटाचे विश्लेषण आणि ड्रोनचे मेंटेनन्स म्हणजेच देखभाल करणे इत्यादी प्रशिक्षणाचा यामध्ये समावेश असणार आहे.
एवढेच नाही तर या ड्रोनच्या माध्यमातून शेतीतील विविध काम कसे करावे यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये पिकांचे निरीक्षण तसेच कीटकनाशके आणि खतांची फवारणी व बियाण्यांची पेरणी इत्यादी बाबींचा समावेश आहे.
नमो ड्रोन दीदी योजनेचा महिलांना कसा होईल फायदा?
या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात आलेले असून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना मदत करेल. या सोबतच कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्याची अपेक्षा देखील आहे. शेतीवरील खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना मदत करू शकते या माध्यमातून रोजगाराच्या संधी देखील वाढण्यास मदत होईल.
या अंतर्गत येणाऱ्या तीन वर्षात दहा लाख महिलांना ड्रोन उडवण्यासाठी व शेतामध्ये ड्रोनचा वापर कसा करावा या संबंधित प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याकरिता सरकारच्या माध्यमातून आता ड्रोनसाठी ट्रेनिंग सेंटर तसेच दुरुस्ती केंद्र आणि चार्जिंग स्टेशन देखील तयार केले जाणार असून सरकार ड्रोन तंत्रज्ञानाचा विकास व्हावा याकरिता संशोधन आणि विकासाला चालना देणार आहे.
एवढेच नाही तर ड्रोनच्या संबंधी जे काही स्टार्टप्स असतील त्यांना सरकारच्या माध्यमातून आर्थिक आणि तांत्रिक मदत देखील केली जाणार आहे.