Eknath Shinde : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास आहे.
येत्या आठ दिवसात म्हणजेच दहा नोव्हेंबर पासून यंदा दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. दिवाळीचा सण मात्र एका आठवड्यावर येऊन ठेपला असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
या अशा आनंदाच्या पर्वात राज्य शासनाने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय अर्थातच जीआर देखील निर्गमित करण्यात आला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाकडून राज्यातील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दोन हजार रुपयांचा दिवाळी बोनस भाऊबीज म्हणून शिंदे सरकारकडून दिली जाणार आहे.
विशेष बाब अशी की ही रक्कम या संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळी सणाच्या आधीच वर्ग होणार आहे. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची दिवाळी यांचा गोड होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात असून संबंधित कर्मचाऱ्यांनी देखील शिंदे सरकारची या निमित्ताने प्रशंसा केली आहे.
शिंदे सरकारची ही भाऊबीज राज्यातील अंगणवाडीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच लाखमोलाची ठरेल अन संबंधित महिला कर्मचाऱ्यांची भाऊबीज यंदा आनंदात साजरा होईल, असे सांगितले जात आहे.
खरंतर सरकारच्या माध्यमातून दरवर्षी दिवाळीच्या सणाला भाऊबीज म्हणून ठराविक रक्कम अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदत यांना जाहीर केली.
यावर्षी देखील भाऊबीज मिळावी यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शिंदे सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला होता.
यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान शिंदे सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
विशेष बाब अशी की, या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी भाऊबीज रक्कम वितरित करण्याचे ठरवण्यात आले आहे. तसेच, ही भाऊबीज रक्कम दिवाळीच्या पूर्वीच संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. यामुळे संबंधितांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.