Elon Musk Satellite Internet :- जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने आघाडीवर असलेल्या मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट साठी प्रसिद्ध असलेल्या कंपन्या म्हणजे जिओ आणि एअरटेल, तसेच व्ही यासारख्या कंपन्यांचा उल्लेख करता येईल. परंतु इंटरनेट आणि नेटवर्कच्या बाबतीत विचार केला तर प्रामुख्याने भारतात जिओ आणि एअरटेल यांच्यात तगडी स्पर्धा आहे.
तसे पाहायला गेले तर यांचे एकूण रिचार्ज प्लान हे नागरिकांना परवडतील असेच आहेत. परंतु आता भारतातील या महत्त्वाच्या असलेल्या एअरटेल वर जिओ या कंपन्यांना तगडी टक्कर देण्यासाठी एलोन मस्क यांची स्टार लिंक कंपनी भारतामध्ये एन्ट्री करणार असून तिचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिओ आणि एअरटेल ला स्टारलिंक कंपनीकडून मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.
एअरटेल आणि जिओला देणार स्टार लिंक कंपनी तगडी टक्कर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एलोन मस्क यांची सॅटॅलाइट इंटरनेट सेवा पुरवणारी स्टारलिंक कंपनी आता भारतामध्ये एन्ट्री करणार असून याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व सरकारी मंत्रालयांच्या मंजुरी कंपनीने मिळवल्या आहेत व आता स्टारलिंक सर्विस लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या अगोदर स्टारलिंक कंपनीने कुठल्याही परवानग्या न घेता सेवा सुरू केली होती व त्यामुळे या कंपनीवर बंदी घालण्यात आली होती.
परंतु आता सगळ्या परवानग्या मिळवल्यानंतर ही कंपनी सेवा देण्यासाठी तयारी करत आहे. परंतु स्टार लिंक सर्विस लॉन्च झाल्यानंतर मात्र भारतातील जिओ आणि एअरटेल सारख्या कंपनीच्या समोर समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे एअरटेल आणि जिओ हे दोघेही आता सॅटॅलाइट इंटरनेटच्या स्पर्धेमध्ये समाविष्ट झाले आहेत. कारण एअरटेल वन वेब सोबत सॅटॅलाइट सर्विस लाँच करत आहे तर जिओ देखील लक्झेबर्गची कंपनी एसइएस सोबत सॅटॅलाइट सर्विससाठी भागीदारी करण्याच्या तयारीत आहे.
स्टार लिंक सॅटॅलाइट इंटरनेट सर्विस लॉन्च झाल्यानंतर किती राहिल इंटरनेट स्पीड?
भारतामध्ये स्टारलिंक सॅटॅलाइट इंटरनेट सर्विस ची टॉप स्पीड 1.5 ते 2 जीबीपीएस एवढा राहिल असा कंपनीने दावा केला आहे. नावाप्रमाणेच ही एक उपग्रह सेवा असून या सेवेकरीता मोबाईल टॉवरची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे देशातील जे काही डोंगराळ आणि दुर्गम भाग आहेत त्या ठिकाणी देखील अगदी सहजपणे इंटरनेट सेवा पोहोचू शकणार आहेत.
सध्या संपूर्ण जगाचा विचार केला तर 40 पेक्षा जास्त देशांमध्ये स्टारलिंक ही सर्विस देत आहे. स्टारलिंक या सर्विसमध्ये वायफाय राऊटर, पावर सप्लाय केबल आणि एक माउंटिंग ट्रायपॉड देखील दिला जातो. तसेच हे राऊटर सॅटॅलाइट कनेक्टेड असतात. ते पाहायला गेले तर स्टारलिंकने 2021 मध्ये कुठल्याही प्रकारचा परवाना न घेता सर्विस सुरू केली होती.
तसेच फ्री ऑर्डर म्हणून सिक्युरिटीच्या स्वरूपात ग्राहकांकडून सेवा सुरू करण्यापूर्वी पैसे देखील जमा केले होते. परंतु भारत सरकारच्या माध्यमातून मंजुरी न दिल्यामुळे एलोन मस्क यांना त्यांचा प्रकल्प बंद करावा लागला होता. त्यानंतर मात्र भारतीय ग्राहकांचे पैसे परत करण्यात आलेले होते. परंतु आता स्टारलिंक कडून सर्व प्रकारच्या परवानग्या घेण्यात आल्या असून त्यामुळे आता या कंपनीचा सेवेचा मार्ग मोकळा झाला आहे.