Success Story : बाप आणि मुलगा एकत्र येऊन केली बिझनेसची सुरवात ! एक वर्षांत कमविले १२ कोटी रुपये…पहा काय आहे बिझनेस आयडिया

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story:- अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत असतात. यामध्ये अनेक व्यवसाय असे असतात की ते सगळ्यांना माहिती असतात किंवा अगोदरच बाजारपेठेमध्ये असे व्यवसाय अस्तित्वात असतात. परंतु काही व्यवसायाची निवड करतात.परंतु व्यवसाय खूप हटके असतो. अगदी भन्नाट अशा व्यवसायाची निवड काही व्यक्ती करतात व तो यशस्वी देखील करतात. अगदी याच पद्धतीने जर आपण तामिळनाडू राज्यातील के शंकर आणि सेंथील शंकर या बापलेकाच्या जोडीचा विचार केला तर या बाप लेकाच्या जोडीने असा काही भन्नाट व्यवसाय उभारला आहे की आपण विचार देखील करू शकत नाही.त्यामुळे या लेखात आपण या बापलेकाच्या जोडीने नेमका कोणता व्यवसाय उभारला याबद्दलची माहिती घेऊ.

प्लास्टिक वेस्टचा वापर करत बनवले शोभेच्या वस्तू आणि बाटल्यांचा वापर करून बनवले ब्लेझर आणि टी-शर्ट
याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्लास्टिक वेस्ट हा सध्याचा खूप ट्रेडिंग असा विषय असून दररोज आपण पाहिले तर अनेक प्रकारचे प्लास्टिक वेस्ट निर्माण होत असते यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या तसेच बॉक्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स, पिशव्या तसेच प्लास्टिकची पाकिटे इत्यादींचा समावेश यामध्ये करता येईल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या या प्लास्टिकच्या कचऱ्याचे व्यवस्थापन किंवा नियोजन कशा पद्धतीने करावे हा देखील एक मोठा प्रश्न सरकार समोर देखील आहे.

परंतु तामिळनाडू राज्यातील के शंकर आणि सेंतिल शंकर यांनी प्लास्टिकचा बाटल्यांचा वापर केला व त्यापासून जॅकेट, लेझर तसेच टी-शर्ट आणि बॉटम बनवत आहेत व या माध्यमातून दररोज 15 लाख प्लास्टिकच्या बाटल्या लँड फील मध्ये जाण्यापासून वाचत आहेत. श्री रिंगा पॉलीमर्स नावाच्या त्यांच्या कंपनीमध्ये दररोज पंधरा लाख प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर केला जातो. या बाटल्यांचा वापर झाल्यानंतर सहसा या बाटल्या टाकल्या जातात.

परंतु या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी एक उत्तम मार्ग शोधलेला आहे. प्रत्येक वर्षापासून त्यांनी प्लास्टिकचा पुनर्वापर या पद्धतीने केला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत केशंकर यांचा मुलगा सेंथील शंकर याने प्लास्टिकच्या कचऱ्याचे शाश्वत फॅशनमध्ये रूपांतर केले असून 2021 मध्ये त्यांनी इकोलाईन नावाचा केला आहे. या माध्यमातून ते देशभरातील कचरा गोळा करणाऱ्या पन्नास हजार लोकांकडून प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून त्यापासून टी-शर्ट, पॅन्ट आणि ब्लेझर सारख्या वस्तू बनवतात.

अशा माध्यमातून त्यांनी आतापर्यंत सुमारे 50 लाख प्लास्टिकच्या बाटल्या लँड फीलमध्ये जाण्यापासून वाचवले आहेत. साधारणपणे एक जॅकेट बनवण्याकरिता आठ प्लास्टिकच्या बाटल्या आणि सुमारे वीस बाटल्यांचा वापर करून एक जॅकेट बनवता येते.त्यांचा ब्रँड खूप प्रसिद्ध झाला असून फेब्रुवारी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शाश्वत इको लाईन चा प्रचार करण्यासाठी संसदेमध्ये त्यांनी बनवलेले जॅकेट घातले होते.

एवढेच नाही तर जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्या दरम्यान देखील त्यांनी हे जॉकेट परिधान केले होते. याबाबत सेंथिल त्यांनी म्हटले की आम्ही ज्या ब्रँड साठी खूप मेहनत घेतली त्या ब्रँडला आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली व याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे. तसेच या कार्यक्रमानंतर आमच्या उत्पादनाच्या विक्रीमध्ये 25% ची वाढ झाली असे देखील त्यांनी म्हटले. या प्लास्टिक वेस्ट पासून बनवलेल्या उत्पादनांच्या किंमती पाचशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान आहे. जर त्यांची प्रत्येक महिन्याला ऑर्डर्स पाहिली तर ती वीस हजार च्या आसपास असून वार्षिक उलाढाल 12 कोटी रुपयांची आहे.

Leave a Comment