मराठमोळ्या शेतकऱ्याची धमाल ! गायीचं शेण विकून बांधला चक्क एक कोटींचा बंगला, वाचा ही आगळीवेगळी यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : शेती आणि शेतकरी म्हटलं की अनेकजण नाक मुरडतात. शेतकरी म्हणजे मोलमजुरी करणारा आणि गावठी असतो असा अनेकांचा समज आहे. पण शेतकरी हा एक ब्रँड आहे. शेतकरी अस एक रसायन आहे जो त्याचे स्वतःचे पोट भरून संपूर्ण जगाचे पोट भरतो.

त्यामुळेच शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा अशी उपाधी देण्यात आली आहे. मात्र स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारी उच्चभ्रू समाजातील लोक शेतकऱ्याला कमी लेखतात. पण हा शेतकरी राजा आपल्या मेहनतीच्या जोरावर, आपल्या कल्पकतेच्या जोरावर या उच्चभ्रू समाजातील लोकांना नेहमीच शेतकरी हा एक ब्रँड असल्याचे दाखवून देतो.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याच्या एका प्रगतिशील शेतकऱ्याने देखील असच एक साजेसं उदाहरण आपल्यासमोर मांडल आहे. सांगोला तालुक्यातील मौजे इमडेवाडी येथील प्रगतिशील शेतकऱ्याने चक्क गाईच्या शेणाच्या विक्रीतून करोडो रुपयांची कमाई केली आहे.

याच कमाईतुन या प्रगतीशील शेतकऱ्याने चक्क एक कोटी रुपयांचा टोलेजंग बंगला आपल्या शेतात उभारला आहे. म्हणून सध्या या प्रगतीशील शेतकऱ्याची इमडेवाडी व आजूबाजूच्या पंचक्रोशीत चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

प्रकाश नेमाडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर जमीन होती. परंतु त्यांची शेती ही बागायती नव्हती. त्यांच्याकडे पाण्याची शाश्वत उपलब्धता नव्हती.

यामुळे शेतीमधून अपेक्षित अशी कमाई त्यांना होत नव्हती. परिणामी त्यांनी शेती सोबतच दुग्ध व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला मात्र एकाच गाईपासून त्यांनी दुधाचा व्यवसाय चालू केला. सुरुवातीला ते स्वतः गावात जाऊन दूध विक्री करत.

पण आता त्यांच्याकडे दीडशे पेक्षा अधिक गाई आहेत. विशेष म्हणजे ते आता दुधासोबतच गाईचे शेण देखील विक्री करतात. शेतकऱ्यांना, तसेच गोबर प्लांटसाठी ते गायीचे शेण विकतात. विशेष बाब अशी की, त्यांच्याकडील वृद्ध गाईंना देखील ते सोडत नाहीत, त्यांचा सांभाळ करतात.

आता नेमाडे यांनी एक कोटी रुपयांचा बंगला बांधला आहे. एकेकाळी त्यांच्याकडे चार एकर जमीन होती. या जमिनीतून त्यांना अपेक्षित अशी कमाई देखील होत नव्हती.

मात्र आता त्यांनी आपल्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर पशुपालन व्यवसायात साधलेली ही प्रगती आणि मिळवलेलं हे यश निश्चितच इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. एकंदरीत त्यांनी पुन्हा एकदा शेतकरी हा एक ब्रँड असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे.

Leave a Comment