FD Interest Rate : अलीकडे देशातील गुंतवणूकदार एफडी मध्ये गुंतवणूक करण्यास विशेष प्राधान्य दाखवत आहेत. सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणारे अनेकजण बँकेची एफडी योजना, आरडी योजना, पोस्ट ऑफिस अन एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिस ची आरडी योजना अशा अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या काही वर्षांमध्ये चांगला परतावा देखील मिळाला आहे. देशातील पीएसबी अर्थातच पब्लिक सेक्टरमधल्या बँकांनी तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांनी एफडीच्या व्याजदरात चांगली वाढ केली आहे.
याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू लागला आहे. अशातच एफडी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे देशातील दोन बड्या बँकांनी एफडीवरील व्याजदर आणखी वाढवण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे.
एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने आणि एका खाजगी क्षेत्रातील बँकेने एफडी वरील व्याजदर वाढवण्याचे जाहीर केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पब्लिक सेक्टर मधील युनियन बँक ऑफ इंडियाने दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी साठी व्याजदर वाढवण्याचे जाहीर केले आहे तसेच खाजगी क्षेत्रातील कर्नाटक बँकेने देखील एफडीवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
युनियन बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना 3.50% पासून ते 7.25% पर्यंतचे व्याजदर दिले जात आहे.
तसेच ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या माध्यमातून 0.50 टक्के अधिकचे व्याजदर दिले जात आहे आणि सुपर जेष्ठ नागरिकांना बँकेच्या माध्यमातून 0.75 टक्के अधिकचे व्याजदर दिले जात आहे.
युनियन बँक 399 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याजदर देत आहे. या एफडीवर सुपर जेष्ठ नागरिकांना तब्बल आठ टक्क्यांचे व्याजदर मिळत आहे.
दुसरीकडे कर्नाटक बँक 3.5% पासून ते 7.25% पर्यंतचे व्याजदर ऑफर करत आहे. यामुळे या दोन्ही बँकेत एफडी करू इच्छिणाऱ्यांना चांगला परतावा मिळू शकणार आहे.