FD Interest Rate : तुम्ही बँकेत FD करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. कारण की देशातील खाजगी क्षेत्रातील एका मोठ्या बँकेने एफडीचे व्याज वाढवले आहे. यामुळे आता एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना अधिकचा परतावा मिळणार आहे.
खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक पब्लिक सेक्टर बँकांनी आणि प्रायव्हेट सेक्टर बँकांनी एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.
त्यामुळे एफडी करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही महिन्यात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. आता प्रत्येकच जण कष्टाने कमावलेल्या पैसा सुरक्षित गुंतवणूक म्हणून एफडीत गुंतवत आहे.
अशातच आता खाजगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठीच्या व्याजदरात मोठी वाढ करण्याची घोषणा केली आहे.
यानंतर आता सामान्य गुंतवणूकदारांना एफडीवर 3.50 टक्के ते 7.75 टक्के व्याज मिळणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळू शकणार आहे.
विशेष बाब अशी की, ज्येष्ठ गुंतवणूकदारांना बँकेकडून 0.50 टक्क्यांचे अधिकचे व्याज ऑफर केले जात आहे. म्हणजेच बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 4% पासून ते 8.25% पर्यंतचे व्याज मिळत आहे.
बँकेकडून सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीची एफडी ऑफर केली जात आहे. दरम्यान इंडसइंड बँकेने एफडीच्या व्याजदरात केलेली वाढ 6 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत.
म्हणजेच एफडीचे नवीन व्याजदर 6 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहे. यामुळे गुंतवणूकदारांना आता इंडसइंड बँकेत एफडी केल्यासं चांगला परतावा मिळू शकणार आहे.
बँकेकडून एक वर्ष ते दीड वर्षाच्या कालावधीच्या एफडी साठी सर्वाधिक व्याज ऑफर केले जात आहे. या कालावधीच्या एफडी साठी सर्वसामान्य नागरिकांना 7.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के एवढे व्याज ऑफर केले जात आहे.