चेकच्या मागे केव्हा सही करावी लागते, सही करण्याचे कारण काय ? तज्ञ म्हणतात…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cheque Interesting Fact : बँक खाते धारकांसाठी आजची बातमी अतिशय कामाची आणि महत्त्वाची राहणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये भारतात यूपीआयने पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यासाठी वेगवेगळे डिजिटल पेमेंट एप्लीकेशन देखील उपलब्ध झाले आहेत.

फोनपे, गुगल पे, अमेझॉन पे, पेटीएम अशा वेगवेगळ्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट केले जाऊ लागले आहे. विशेष म्हणजे यूपीआय पेमेंटमुळे ग्राहकांचे व्यवहार सोपे झाले आहेत. आता सहजतेने कोणालाही एका क्लिकवर पैसे पाठवता येत आहेत.

विशेष म्हणजे क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट केले जाऊ लागले आहे. त्यामुळे छोटी पानटपरी असो किंवा मग एखादे भव्य शोरूम सर्वत्र युपीआय पेमेंट एप्लीकेशनने पेमेंट स्वीकारले जात आहे. मात्र असे असले तरी अनेकजण चेकने पेमेंट करतात ही वास्तविकता आहे. काही ठिकाणी फक्त चेकनेच पेमेंट घेतले जाते.

जर तुम्हीही चेकने पेमेंट करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. कारण की, आज आपण चेकच्या मागे केव्हा सही करावी लागते आणि सही करण्याचे मुख्य कारण काय याबाबत तज्ञ लोकांनी दिलेली माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

चेकच्या मागे सही केव्हा करावी लागते

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकच धनादेश म्हणजे चेकच्या मागच्या बाजूला स्वाक्षरी नसते. जे Bearer चेक आहेत, त्यांच्या पाठीमागेच फक्त सही करावी लागते.

बेअरर चेक हा असा चेक आहे जो तुम्ही बँकेत जमा करता, या चेकमध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव नसते. दरम्यान याच बेअरर चेकवर तुम्हाला सही करावी लागते. ईतर कोणत्याच धनादेशावर सही करावी लागत नाही.

चेकमागे सही करण्याचे कारण 

वास्तविक, बेअरर चेक चोरीला जाण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत जर बँकेने चोरी झालेला चेक स्वीकारला आणि सदर व्यक्तीला पैसे ट्रान्सफर झालेत आणि त्यावर सही नसेल तर बँकेवर कारवाई होऊ शकते. या कारणास्तव बँकेला चेकच्या मागील बाजूस स्वाक्षरी आवश्यक असते.

यामुळे बँका बेअरर चेकच्या मागे सही करण्यास सांगतात. यामुळे बँकेने पैसे हस्तांतरित केल्याची खात्री होते. जर चुकीच्या व्यक्तीकडे हस्तांतरण झाले असेल तर तो बँकेचा दोष नसतो. 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर बँक ग्राहकाकडून पत्त्याचा पुरावाही मागते. त्यानंतरच बँक ग्राहकाला पैसे देते.

अनेकदा बँका पुढच्या स्वाक्षरीची पडताळणी करण्यासाठी देखील मागील बाजूस सही करायला लावतात. जर एखाद्या व्यक्तीने स्वाक्षरी करण्यास नकार दिला तर त्याला एक फॉर्म भरावा लागेल आणि रोख काढण्यासाठी बँकेकडे अर्ज करावा लागतो.

अशावेळी बेअरर चेकवर सुद्धा सही करावी लागत नाही 

अनेक वेळा बेअरर चेकवर सुद्धा स्वाक्षरी आवश्यक नसते. जेव्हा ग्राहक त्यांच्या स्वतःच्या खात्यातून चेकद्वारे पैसे काढतात तेव्हा असे होते. याचा अर्थ असा की जर तिसरी व्यक्ती बेअरर चेकमधून पैसे काढण्यासाठी आली तर चेकच्या मागील बाजूस स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

Leave a Comment