भविष्यात एफडीचे व्याजदर आणखी वाढणार का ? एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD News : भारतात अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफडी योजना अन आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना, पोस्ट ऑफिसची एफडी योजना अशा अनेक योजना ग्राहकांपुढे आहेत.

याशिवाय फार पूर्वीपासून सोन्यात आणि चांदीमध्ये गुंतवणूक केली जात आहे. तसेच शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. मात्र असे असले तरी आजही सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणून बँकेची एफडी योजना ओळखली जात आहे.

दरम्यान बँकेच्या एफडी योजनेबाबत एसबीआय बँकेचे एमडी अश्विनी कुमार यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. भविष्यात एफडीचे व्याजदर वाढणार की नाही याबाबत अश्विनी कुमार यांनी मोठी माहिती दिली आहे. खरे तर गुरुवारी अर्थातच काल आठ फेब्रुवारी 2024 ला आरबीआयने रेपो रेट मध्ये कोणताच बदल केला नाही.

रेपो रेट मध्ये घसरण होईल असा अंदाज काही तज्ञांकडून व्यक्त केला जात होता. तर काही तज्ञांनी रेपो रेट स्थिर राहतील असे म्हटले होते. दरम्यान आरबीआयने काल रेपो रेट मध्ये कोणताच बदल न करण्याचे जाहीर करून रेपो रेट स्थिर ठेवले जातील असे स्पष्ट केले आहे.

यामुळे होम लोन, पर्सनल लोन आणि कार लोनचे EMI तसेच कायम राहणार आहेत. पण आरबीआयने रेपोरेट स्थिर ठेवलेले असतानाही एफडीच्या व्याजदरात वाढ होणार असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे, FD व्याजदर वाढतच राहतील असे काही तज्ञांनी म्हटले आहे.

कारण कर्जाची वाढ उच्च पातळीवर आहे. पण त्याच वेळी, ठेव वाढ कमी राहिली आहे. अशा परिस्थितीत ठेवी आकर्षित करण्यासाठी बँका व्याजदर वाढवत राहतील. म्हणजेच ग्राहकांनी अधिकाधिक एफडी केली पाहिजे यासाठी बँकेकडून व्याजदर वाढवले जाण्याची शक्यता आहे.

तज्ञांचे म्हणणे आहे की दीर्घ मुदतीच्या एफडीच्या तुलनेत अल्प मुदतीच्या मुदत ठेवींमध्ये अधिक व्याज वाढवले जाऊ शकते. अलीकडच्या काळात, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक आणि इंडसइंड बँक यासारख्या काही बँकांनी 200 ते 300 दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ सुद्धा केली आहे.

यामुळे तज्ञांचे हे म्हणणे खरे देखील ठरत असल्याचे पाहायला मिळाले आहे. एसबीआयचे एमडी अश्विनी कुमार तिवारी म्हणाले की, ठेवींची वाढ झपाट्याने होत आहे. याचे कारण असे की कर्जाची वाढ अनेक तिमाहीत ठेव वाढीपेक्षा जास्त आहे. कर्जाची उच्च वाढ आणि पैसा शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांकडे वळल्यामुळे ठेवी दर दबावाखाली आहेत.

तथापि, येथे चलनविषयक धोरणाचे कार्य कर्जाची मागणी आणि लोकांकडे कोणते गुंतवणुकीचे पर्याय आहेत याविषयी नाही, परंतु यामुळे ठेवींवरील व्याजदर वाढू शकतात. रेपो दरातील वाढीव्यतिरिक्त, कर्जाच्या वाढीचे आणि ठेवीतील वाढीचे गुणोत्तर कधीही व्याजदर वाढविण्यात मोठी भूमिका बजावत यास्तव.

अशा परिस्थितीत, कर्जाची वाढ जेव्हा ठेवींच्या वाढीपेक्षा जास्त असते, तेव्हा बँकांना नवीन ठेवी आकर्षित करण्यासाठी ठेवींवर व्याजदर वाढवावे लागतात. हेच कारण आहे की भविष्यात एफडीचे व्याजदर आणखी वाढणार हे जवळपास स्पष्ट होत आहे. यामुळे एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना भविष्यात आणखी चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment