मोठी बातमी ! देशातील ‘या’ बड्या बँकेने एफडीच्या व्याजदरात केली मोठी वाढ, करोडो ग्राहकांना मिळणार दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD Interest Rate : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र असे असले तरी एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. याउलट, सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही एफडीलाच प्राधान्य दिले जात आहे.

परिणामी येथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या डे बाय डे वाढत आहे. याचे कारणही तसे खासच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक प्रमुख बँकांनी एफडीच्या व्याजदरात मोठी वाढ केली आहे.

विशेष म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी एसबीआय बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भविष्यात एफडी व्याजदरात आणखी वाढ होऊ शकते असा दावा केला आहे. दरम्यान, तज्ज्ञांचा हा दावा आता खरा ठरू लागला आहे.

कारण की देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील एका मोठ्या बँकेने एफडी व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसी या प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठ्या बँकेने एफडीच्या व्याजदरात 0.25 टक्के एवढी वाढ करण्याचे जाहीर केले आहे.

बँकेने ही वाढ दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी केली आहे. यामुळे आता गुंतवणूकदारांना अधिकचा परतावा मिळवता येणे शक्य होणार आहे.

कोणत्या कालावधीच्या एफडीचे व्याजदर वाढवले ?

एचडीएफसी बँकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बँकेने काही निवडक कालावधीच्या एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. म्हणजेच सर्वच कालावधीच्या एफडी व्याजदरात वाढ झालेली नाही.

दोन कोटी रुपयांच्या मर्यादेत 18 महीने ते 21 कालावधीच्या एफडी करिता 0.25 टक्के एवढे व्याजदर वाढवण्यात आली असल्याची माहिती बँकेकडून समोर आली आहे. यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही.

विशेष बाब अशी की बँकेकडून ज्येष्ठ गुंतवणूकदारांना 0. 50 टक्के अधिकचे व्याजदर दिले जाते. तसेच बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतची एफडी ऑफर करते. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करता येते.

18 महिने ते 21 महिन्याची FD स्कीम

एचडीएफसी बँकेने 18 महिने ते 21 महिन्याच्या टाईम पिरियडसाठी असलेल्या एफडी स्कीमचे व्याजदर 0.25 टक्क्यांनी वाढवले आहे. आधी या स्कीम मध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सात टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50% एवढे व्याज दिले जात होते. आता मात्र सर्वसामान्य नागरिकांना 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75% एवढे व्याजदर मिळणार आहे.

अंमलबजावणी केव्हापासून होणार

एचडीएफसी बँकेने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. अर्थातच एफडीचे नवीन व्याजदर 9 फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. यामुळे एचडीएफसी बँकेत एफडी करू इच्छिणाऱ्यांना आता अधिकचा परतावा मिळणार आहे. परिणामी एफडी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल असा अंदाज आहे.

Leave a Comment