FD Interest Rate : भारतात अलीकडे गुंतवणुकीसाठी एफडी करण्याला विशेष पसंती दाखवली जात आहे. याचे कारण म्हणजे देशातील अनेक बँकांनी आता एफडीवर चांगले व्याजदर ऑफर करायला सुरवात केली आहे.
यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी आता बँकेच्या एफडी योजनेला विशेष महत्त्व आले आहे. विशेष बाब म्हणजे या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात देशातील अनेक बँकांनी एफडी अर्थातच मुदत ठेव योजनेवरील व्याज वाढवले आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्हीही एफडी अर्थातच मुदत ठेव करण्याचा तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे.
कारण की आज आपण या नवीन वर्षात देशातील कोणत्या दोन बड्या बँकांनी एफडी वरील व्याजदर वाढवले आहे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पंजाब नॅशनल बँक : पब्लिक सेक्टर मधील या बड्या बँकेने मुदत ठेव योजनेवरील व्याज वाढवण्याचे जाहीर केले आहे. या बँकेने 300 दिवसांचे एफडीवरील व्याजदर 80 बेसिस पॉईंट ने वाढवले आहे. बँकेकडून तीनशे दिवसांच्या एफडी साठी आता सर्वसामान्यांना 7.05 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7.55 आणि सुपर सीनियर सिटीजनसाठी 7.85% व्याज ऑफर केले जात आहे. पीएनबी बँकेकडून वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी साठी वेगवेगळे व्याज ऑफर केले जात आहे.
सरासरी बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना 3.50 टक्क्यांपासून ते 7.25 टक्क्यांपर्यंत व्याजदर दिले जात आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 4% पासून ते 7.75 टक्क्यांपर्यंत व्याजदर दिले जात आहे.
बँक ऑफ बडोदा : या पब्लिक सेक्टर मधील बँकेने देखील एफडी वरील व्याजदरात वाढ केली आहे. विशेष म्हणजे बँकेने एक नवीन एफडी योजना लॉन्च केली आहे. या योजनेला बी ओ बी 360 असे नाव देण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत 360 दिवसांसाठी एफडी केली जाऊ शकते. तसेच या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना सर्वसामान्य ग्राहकांना 7.10% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60% एवढे व्याज दिले जात आहे.
सदर बँकेत सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी एफडी केली जाऊ शकते. यासाठी 4.45 ते 7.25% पर्यंतचे व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना मात्र अतिरिक्त 0.50% वाढीव व्याज दिले जात आहे.