RD मध्ये गुंतवणूक करताय ? देशातील कोणत्या बँका देताय सर्वाधिक व्याज, यादी पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RD Interest Rate : भारतात गुंतवणुकीला फार पूर्वीपासूनच महत्त्व आहे. आपल्या देशात गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांनी पुढे वेगवेगळे पर्याय आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीची बचत योजना, पोस्ट ऑफिसची एफडी आणि आरडी योजना अशा अनेक योजना आहेत.

याशिवाय अनेक जण सोन्या-चांदीच्या गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. एवढेच नाही तर काहीजण शेअर मार्केट मध्ये आणि शेअर मार्केटशी संलग्न असलेल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत. मात्र येथील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित नसते. शेअर बाजारातील गुंतवणूक आणि शेअर बाजाराशी निगडित असलेल्या ठिकाणची गुंतवणूकही जोखीमपूर्ण असते.

यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य अभ्यास करावा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करावी असा सल्ला दिला जातो. दरम्यान बँकेची आरडी योजना अलीकडे विशेष लोकप्रिय बनत चालली आहे. बँकेच्या आरडी योजनांमधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील मिळत आहे.

ज्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक करायची असेल अशा व्यक्तींसाठी आरडी योजना विशेष फायद्याची ठरते. विशेष म्हणजे येथील इन्व्हेस्टमेंट देखील एफडीप्रमाणेच सुरक्षित आहे. अशा परिस्थितीत आज आपण देशातील अशा बँकांची माहिती जाणून घेणार आहोत जे आर डी वर चांगले व्याज देत आहेत.

एस बँक : Yes Bank आरडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले व्याज देत आहे. ही बँक आरडी योजनांवर 7.75 टक्क्यांपर्यंतचे व्याज देत आहे. यामुळे जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर येस बँकेचा ऑप्शन बेस्ट ठरू शकतो.

कॅनरा बँक : ही देशातील एक लोकप्रिय बँक असून एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आणि आरडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले व्याज देते. या बँकेकडून आरडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 7.25% दराने व्याज दिले जात आहे.

पंजाब नॅशनल बँक : ही बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना आणत असते. या बँकेकडून आरडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले व्याज दिले जात आहे. ही बँक कॅनरा बँकेप्रमाणेच आरडीसाठी 7.25% दराने व्याज देत आहे.

एचडीएफसी बँक : भारतातील प्रायव्हेट सेक्टरमधील अर्थातच खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून एचडीएफसी बँकेची ओळख आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या सवलती पुरवत असते. बँकेकडून सवलतीच्या दरात होम लोन, कार लोन, गोल्ड लोन पुरवले जात आहे. शिवाय एफडी साठी चांगले व्याज दिले जात आहे. ही बँक आरडीसाठी देखील चांगले व्याज देते. बँकेकडून आरडीसाठी 7.10% एवढे व्याज दिले जात आहे.

आयसीआयसीआय बँक : एचडीएफसी बँकेप्रमाणे याही बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आरडीसाठी चांगले व्याज उपलब्ध करून दिले जात आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आरडीसाठी 7.10% दराने व्याज दिले जात आहे.

एसबीआय : देशातील पब्लिक सेक्टरमधील अर्थातच सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयला ओळखले जाते. ही बँक आपल्या ग्राहकांना आरडीसाठी सात टक्के एवढे व्याज देत आहे. 

Leave a Comment