FD News : भारतात गुंतवणुकीसाठी अलीकडे वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. पण, आजही असे काही लोक आहे जें की गुंतवणूकीसाठी FD करण्याला पसंती दाखवतात.
दरम्यान, जर तुम्हीही नजीकच्या काळात FD मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की, आज आपण FD वर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्यां बँकेची माहिती पाहणार आहोत.
आपल्या देशात एफडीवर राष्ट्रीय बँकांच्या तुलनेत स्मॉल फायनान्स बँका अधिक व्याज देत आहेत. पण स्मॉल फायनान्स बँकेत गुंतवणूक करणे थोडेसे रिस्की असते. तथापि, अनेकजण स्मॉल फायनान्स बँका अधिक व्याज ऑफर करत असल्याने यात गुंतवणूक करतात.
देशात अशा काही स्मॉल फायनान्स बँक आहेत ज्या की तब्बल 9% हुन अधिक व्याज ऑफर करत आहेत. आज आपण अशाच पाच बँकांची माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
Fd वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या Small Finance Bank
ESAF स्मॉल फायनान्स बँक : ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 8.50% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9% व्याज देत आहे.
इक्विटस स्मॉल फायनान्स बँक : ही बँक देखील आता आपल्या ग्राहकांना चांगले इंटरेस्ट रेट ऑफर करत आहे. आपल्या सामान्य ग्राहकांना 8.50% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 888 दिवसांच्या FD वर 9% व्याज देत आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक : आपल्या सामान्य ग्राहकांना 1000 दिवसांच्या FD वर 8.51% व्याज आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.1% व्याज देत आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक : आपल्या सामान्य ग्राहकांना 101 दिवसांच्या FD वर 9% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.50% व्याज देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 5 वर्षांच्या FD वर 9.10% व्याज आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.60% व्याज देत आहे.