FD News : अलीकडे भारतात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन उपलब्ध झाले आहेत. मात्र असे असले तरी आजही गुंतवणुकीसाठी एफडीला विशेष महत्त्व दाखवले जाते. अनेकजण एफडीमध्ये गुंतवणूक करतात. याचे कारण म्हणजे एफडीमधील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते.
विशेष म्हणजे, अलीकडे अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदर बऱ्यापैकी वाढवले आहेत. परिणामी एफडी केल्याने चांगला परतावा मिळतोय शिवाय बँकेत गुंतवलेला पैसा हा पूर्णपणे सुरक्षित राहत आहे. दरम्यान, आज आपण एफडीमध्ये गुंतवलेली रक्कम किती काळात दुप्पट होईल हे कसं जाणून घ्यायच ? याविषयी माहिती पाहणार आहोत.
खरेतर अनेकांच्या माध्यमातून एफडी मध्ये गुंतवणूक केल्यास किती कालावधीत पैसे दुप्पट होतील असा प्रश्न उपस्थित केला जात होता ? यामुळे आज आपण ही ट्रिक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण रूल ऑफ 72 समजून घेणार आहोत.
काय आहे Rule Of 72
Rule Of 72 हा एक असा फॉर्मुला म्हणजे सूत्र आहे जें की गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरते. यातून गुंतवणूकदारांना त्यांनी गुंतवलेला पैसा किती दिवसात दुप्पट होईल याची माहिती समजते. हा फॉर्म्युला अचूक उत्तर देण्यास सक्षम असल्याचा दावा तज्ञ करतात.
बहुतेक तज्ञ हा फॉर्मुला सर्वात अचूक असल्याचे सांगतात. या सूत्राच्या मदतीने, गुंतवणूक केलेली रक्कम किती दिवसांत दुप्पट होईल हे समजते. Rule Of 72 फॉर्म्युलाचा वापर करणे खूपच सोपे आहे.
तुम्हाला फक्त तुम्ही ज्या एफडी योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा तयारीत आहात त्यावर सध्या किती व्याज मिळत आहे एवढे माहिती असणे आवश्यक आहे. या फॉर्मुल्या अंतर्गत FD वर मिळणाऱ्या व्याजेला ७२ ने भागायचे आहे. यानंतर तुम्हाला समजेल की तुमची गुंतवणूक किती वर्षांत दुप्पट होणार आहे.
या फॉर्मुलाचा वापर करून तुम्ही सहजतेने कोणती एफडी योजना तुमचे पैसे किती दिवसात दुप्पट करू शकते हे जाणून घेऊ शकणार आहात. आता आपण या फॉर्मुलाचा वापर एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला तर मग आता आपण या फॉर्मुलाचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊयात.
कसा वापराल हा फॉर्मुला ?
समजा तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये 5 लाख रुपये गुंतवायचे आहेत. तुम्ही ही गुंतवणूक ५ वर्षांसाठी केली आहे. तुम्हाला ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के व्याज मिळत आहे. आता तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की किती वर्षांत तुमची गुंतवणूक दुप्पट होईल. अशा परिस्थितीत, हे सूत्र तुम्ही लागू करु शकता.
म्हणजे तुम्हाला 72 ला 7.5 ने विभाजित करायचे आहे. 72/7.5 = 9.6 म्हणजेच तुमचे पैसे 9 वर्षे आणि 6 महिन्यांत दुप्पट होतील. पण, पोस्ट ऑफिसमध्ये थेट 10 वर्षे किंवा 9, 9 वर्षे आणि सहा महिन्यांसाठी एफडी नाहीये.
यामुळे तुम्हाला सुरुवातीला 5 वर्षासाठी टाईम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे आणि त्यानंतर मग पुन्हा 5 वर्षासाठी तुम्ही या स्कीममध्ये गुंतवणूक करून तुमचे टार्गेट म्हणजेच पैसे डबल करण्याचे टारगेट अचिव्ह करू शकता.