FD News : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये आणखी वाढली आहे. याचे कारण म्हणजे आपल्या देशात सुरक्षित गुंतवणुकीला अधिक महत्त्व दिले जाते.
कष्टाने कमावलेला पैसा वाया जाऊ नये यामुळे नेहमीच पोस्ट ऑफिसच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची FD अन RD स्कीम, एलआयसीच्या बचत योजना तसेच बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्यास अधिक पसंती दाखवली जाते.
जर तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत असाल तर जी बँक तुम्हाला चांगले व्याज ऑफर करेल त्या बँकेत गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण एसबीआय बँकेच्या सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या एका एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
SBI ची स्पेशल FD Scheme
एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना चालवत आहे. बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटवर विविध कर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत.
एसबीआय बँक होम लोन, एज्युकेशन लोन, पर्सनल लोन, बिजनेस लोन असे विविध कर्ज ऑफर करत आहे. शिवाय बँक एफडी करणाऱ्यांना देखील चांगला परतावा देत आहे.
दरम्यान एसबीआय बँकेने एक स्पेशल FD स्कीम लाँच केली आहे. अमृत कलश एफ डी स्कीम असे या योजनेचे नाव आहे. ही एफडी योजना चारशे दिवसात परिपक्व होते.
या एफबी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.1% एवढे व्याजदर दिले जात आहे मात्र या स्पेशल एफडी योजनेत सीनियर सिटीजन ग्राहकांनी जर गुंतवणूक केली तर त्यांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत अधिकचे इंटरेस्ट रेट दिले जात आहे.
सीनियर सिटीजन ग्राहकांना या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.60% दराने व्याज दिले जात आहे. अर्थातच या एफ डी योजनेत सीनियर सिटीजन ग्राहकांनी गुंतवणूक केली तर त्यांना चांगला परतावा मिळणार आहे.
या योजनेत दोन कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते. एसबीआय बँकेची ही एफडी योजना गुंतवणूकदारांमध्ये खूपच लोकप्रिय ठरत आहे. मात्र या एफडी योजनेत गुंतवणुकीसाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत आहे.
यानंतर या एफडी योजनेत गुंतवणूक करता येणार नाही. यामुळे जर तुम्हालाही या स्कीम मध्ये गुंतवणूक करायची असेल तर लवकरात लवकर पैसे गुंतवावे लागणार आहेत.