पुढील 5 दिवस कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान ? कुठे पडणार अवकाळी पाऊस ? वाचा हवामान खात्याचा नवीन अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आहे. एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. काही ठिकाणी तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. यावरून राज्यात उष्णतेची लाट पसरली असल्याचे दिसत आहे.

तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान आणि वादळी पाऊस होत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला थोडासा दिलासा मिळालेला आहे परंतु वादळी पावसाचा शेती पिकांवर मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे.

यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज देखील राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात आज गारपीट होणार असेही आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. अशातच, मात्र मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या माध्यमातून मराठवाड्याच्या हवामाना संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

हवामान खात्याने मराठवाड्यातील पुढील पाच दिवसाचे हवामान कसे राहणार याबाबत डिटेल माहिती दिली आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे पुढील पाच दिवस मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

मराठवाडयात पुढील 5 दिवस तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघ गर्जना सह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज देण्यात आला आहे. आता आपण हवामान खात्याने नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कोणत्या जिल्ह्यात बरसणार वादळी पाऊस

IMD ने म्हटल्याप्रमाणे, आज मराठवाडा विभागातील धाराशिव अन लातूर जिल्हयात हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे. उद्या जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव व लातूर या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असा अंदाज आहे.

तसेच 25 एप्रिलला बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो असा अंदाज देण्यात आला आहे.

या कालावधीत या सदर जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहणार असे म्हटले जात आहे. यामुळे निश्चितच मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार आहे.

आगामी 5 दिवस मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांना आपल्या शेती पिकांची तथा हार्वेस्टिंग झालेल्या शेतमालाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

Leave a Comment