FD News : अलीकडे फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. जर तुम्हीही मुदत ठेव योजनेत पैसा गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरेतर अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय गुंतवणूकदारांपुढे आहेत.
असे असतानाही मात्र एफडी करण्याला विशेष प्राधान्य दिले जाते हे विशेष. याचे कारण म्हणजे एफडी मध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला जातो. शिवाय अलीकडे देशातील अनेक बँकांनी FD साठी चांगला परतावा देण्यास सुरवात केली आहे.
देशातील बँका आता एफडीवर चांगले व्याज देत आहेत. दरम्यान, आज आपण देशातील अशा चार बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की एफडीवर नऊ टक्क्यांपेक्षा अधिकचे व्याज देत आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक : ही देशातील एक प्रमुख स्मॉल फायनान्स बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगल व्याज देत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकेच्या माध्यमातून एफडीसाठी 3.75% ते 8.50% पर्यंत व्याज देत आहे.
या बँकेकडून आपल्या ग्राहकांना 15 महिन्यांच्या FD साठी कमाल 8.50% व्याज ऑफर केले जात आहे. तसेच याच कालावधीच्या FD साठी ही बँक ज्येष्ठ नागरिकांना कमाल 9% व्याज ऑफर करत आहे.
बँकेने हे नवीन दर 7 मार्चपासून लागू केलेले आहेत. यामुळे या बँकेच्या FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळू शकणार आहे.
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक : शिवालिक स्मॉल फायनान्स बँक ही देखील एफडी साठी चांगले व्याज वापर करते. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बँक 3.50% ते 8.70% पर्यंत व्याज देत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना FD साठी 4% ते 9.20% या दरम्यान व्याज दिले जात आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 24 महिने 1 दिवस ते 36 महिना कालावधीच्या FD वर बँक 8.70% व्याज ऑफर करत आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना ही बँक 9.20% एवढे व्याज देत आहे. हे नवीन दर दोन मार्चपासून लागू झाले आहेत.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : ही बँक सीनियर सिटीजन यांना 25 महिन्यांच्या एफ डी साठी 9.01% आणि सुपर सीनियर सिटीजन यांना 9.25% एवढे व्याज देत आहे. एक मार्च 2024 पासून हे नवीन दर लागू झालेले आहेत.
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक : या बँकेकडून चारशे दिवसांच्या एफडी साठी नियमित ग्राहकांना 8.40% आणि जास्त नागरिकांना 9.15% एवढे व्याज दिले जात आहे. तसेच 1111 दिवसाच्या एफडी साठी नियमित ग्राहकांना ही बँक 8.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.25% एवढे व्याज देत आहे.