FD News : आपल्या देशात गुंतवणुकीसाठी अलीकडे विविध ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. मुदत ठेव योजना हा देखील असाच एक गुंतवणुकीचा सुरक्षित प्रकार आहे. खरे तर देशात गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिस्क असते.
येथून खात्रीशीर परतावा मिळत नाही. गुंतवलेल्या पैशांवर कोणतीचं सुरक्षितता नसते. हेच कारण आहे की अनेक जण आजही फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवण्याला विशेष प्राधान्य दाखवत आहेत. विशेष बाब अशी की एफडी करणाऱ्यांना आता बँकेच्या माध्यमातून चांगला परतावा देखील दिला जात आहे.
सामान्य ग्राहकांपेक्षा बँकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याज दिले जात आहे. दरम्यान आज आपण ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप पाच बँकांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका कोणत्या?
DCB बँक : ही बँक ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव (FD) वर 8.6% व्याजदर देत आहे. हा दर 25 महिने ते 26 महिन्यांच्या मॅच्युरिटी कालावधी असलेल्या FD ला लागू आहे. दोन कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी हा दर लागू राहणार आहे.
IDFC फर्स्ट बँक : आयडीएफसी फर्स्ट बँक देखील जेष्ठ नागरिकांना चांगला परतावा देत आहे. ही बँक 500 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8.5% व्याजदर देत आहे.
बंधन बँक : ही बँक एका वर्षात म्हणजे 360 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना ८.३५% व्याजदर देत आहे.
IndusInd बँक : ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एक वर्ष ते दोन वर्षांच्या दरम्यानच्या FD वर 8.25% व्याज दर देत आहे.
येस बँक : ही बँक 18 महिने आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8.25% व्याज दर देत आहे.