पोस्ट ऑफिसची योजना महिलांना बनवणार लखपती ! तुमच्या घरातील लक्ष्मीच्या नावे ‘या’ योजनेत पैसा गुंतवा अन 2 वर्षात श्रीमंत बना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफडी योजना आणि आरडी योजना, पोस्ट ऑफिसची एफडी योजना आणि आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना इत्यादी ठिकाणी गुंतवणूक केली जात आहे.

काही गुंतवणूकदार शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. मात्र या ठिकाणी केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे जोखीमपूर्ण असते. यामुळे आजही सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेक जण पोस्टाच्या किंवा एलआयसीच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे अधिक पसंत करतात.

दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पोस्ट ऑफिसने महिलांसाठी एक विशेष योजना सुरु केली आहे. ही योजना महिला गुंतवणूकदारांना कमी वेळात श्रीमंत बनवणार आहे.

महिला आणि मुलींसाठी पोस्ट ऑफिसने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना सुरू केळी आहे. ही योजना फक्त महिलांसाठी सुरु आहे. 2025 पर्यंत महिला या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

या योजनेत कोण खाते उघडू शकतो ?

मिळालेल्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिसच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत कोणतीही भारतीय महिला गुंतवणुकीस पात्र राहणार आहे. या योजनेत गुंतवणुकीसाठी वयाची अट नाहीये. याशिवाय, कायदेशीर किंवा नैसर्गिक पालक, पुरुष पालकांसह, अल्पवयीन मुलीसाठी खाते उघडू शकतात.

किती व्याज मिळणार

या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत कर सूट मिळते. मात्र या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर जे व्याज मिळणार त्या व्याजासाठी आयकर भरावा लागणार आहे.

या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.5% या इंटरेस्ट रेटने परतावा दिला जात आहे. व्याज हे प्रत्येक तीन महिन्यात खात्यावर येते. पण व्याज आणि मूळ रक्कम ही मॅच्युरिटी वरच खातेधारकाला मिळते.

दोन लाख गुंतवले तर किती रिटर्न मिळणार

या योजनेत जर एखाद्या महिलेने दोन लाख रुपये गुंतवले तर तिला मॅच्युरिटी वर दोन लाख 32 हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. या योजनेत किमान एक हजार रुपये आणि कमाल दोन लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.

मात्र या योजनेत एकापेक्षा जास्तीचे अकाउंट ओपन केले जाऊ शकतात. तथापि एक अकाउंट ओपन केल्यानंतर तीन महिन्यांनी दुसरे अकाउंट ओपन करता येते.

Leave a Comment