FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! देशातील ‘या’ बँका एफडीवर देताय 9 टक्क्यांपर्यंचे व्याज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD News : एफडी करणाऱ्यांसाठी आजची ही बातमी अतिशय महत्त्वाची आणि कामाची ठरणार आहे. खरंतर अलीकडे FD अर्थातच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे कारण म्हणजे मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना आता चांगला परतावा मिळू लागला आहे.

तथापि अनेकांच्या माध्यमातून देशातील कोणत्या बँका मुदत ठेव योजनेत सर्वात जास्त व्याज ऑफर करत आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेणार आहोत.

आज आपण देशातील अशा काही बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की, एफडीवर 9 टक्क्यांपर्यंतचे व्याज देत आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर 

FD साठी सर्वोत्कृष्ट व्याज देणाऱ्या बँका

युनिटी स्मॉल फायनान्स बँक : ही देशातील एक प्रमुख स्मॉल फायनान्स बँक आहे. या बँकेकडून एफडी वर चांगले व्याज ऑफर होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना एफडी साठी 4.50 टक्क्यांपासून ते 9 टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर केले जात आहे. बँकेकडून 1001 दिवसांच्या एफडीवर नऊ टक्के एवढे व्याज मिळत आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : ही एफडी साठी सर्वोत्कृष्ट व्याज ऑफर करणारी देशातील दुसऱ्या क्रमांकाची स्मॉल फायनान्स बँक आहे.

या बँकेकडून FD साठी 8.65% पर्यंतचे व्याज दिले जात आहे. दोन वर्ष आणि दोन दिवस कालावधीच्या एफडीसाठी बँकेकडून 8.65% एवढे विक्रमी व्याज मिळत आहे.

Equitas Small Finance Bank : ही स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना FD वर सर्वोत्कृष्ट व्याज ऑफर करत आहे. ही बँक FD साठी 3.5% ते 8.50% पर्यंत व्याजदर देत आहे. बँकेकडून ४४४ दिवसांच्या FD वर ८.५० टक्के व्याज मिळत आहे.

यामुळे जर तुमचाही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तर या बँकेची 444 दिवसांची ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : या स्मॉल फायनान्स बँकेकडून एफडी साठी चांगले व्याज ऑफर होत आहे. बँकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही बँक एफडी साठी 8.50 टक्क्यांपर्यंतचे व्याज देते. दोन ते तीन वर्ष कालावधीच्या एफ डी साठी बँकेकडून 8.50% एवढे व्याज मिळत आहे.

Leave a Comment