FD News : अनेकांचा आपल्याकडील पैसा एफडीत गुंतवण्याचा प्लॅन आहे. FD अर्थातच फिक्स डिपॉझिटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली गेली आहे. विशेष म्हणजे सध्या एफडीवर बँकांच्या माध्यमातून चांगले व्याजदर ऑफर केले जात असल्याने आगामी काळात ही गुंतवणूक आणखी वाढणार आहे. आता महिला वर्ग देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याऐवजी फिक्स डिपॉझिट करण्याला अधिक महत्त्व दाखवत आहेत.
दरम्यान जर तुम्ही ही नजीकच्या भविष्यात FD करण्याचा तयारीत असाल? तीन वर्षे कालावधीसाठी यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल ? तर आज आम्ही तुम्हाला तीन वर्ष कालावधीच्या एफडीवर जेष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज देणाऱ्या काही प्रमुख बँकांची माहिती सांगणार आहोत.
ज्या बँका तीन वर्षीय मुदत ठेव योजनांमध्ये अधिकचे व्याज ऑफर करत आहेत त्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक केली तर तुमचा पैसा लवकर वाढू शकणार आहे.
3 वर्षाच्या FD वर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या बँका
बँक ऑफ बडोदा : या बँकेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के एवढे व्याज दिले जात आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये एक लाख रुपये गुंतवलेत तर त्यांना एक लाख 26 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे. BOB ही एक सरकारी बँक आहे.
ऍक्सीस बँक : मिळालेल्या माहितीनुसार खाजगी क्षेत्रातील ॲक्सिस बँक 3 वर्षाच्या एफडीवर जेष्ठ नागरिकांना 7.60% एवढी व्याजदर येते. येथे एक लाख रुपये गुंतवले तर ज्येष्ठ नागरिकांना मॅच्युरिटीवर एक लाख 25 हजार रुपये मिळणार आहेत
कॅनडा बँक : ही बँक तीन वर्षांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.30% या रेटने व्याज देत आहे. येथे गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिकांना मॅच्युरिटी वर एक लाख 24 हजार रुपये मिळणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया : एसबीआय देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. देशात एकूण 12 पीएसबी असून एसबीआय सर्वात मोठी पीएसबी आहे. या बँकेकडून आपल्या जेष्ठ ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडी स्कीमवर 7.25% या रेटने व्याज दिले जात आहे. एखाद्या सीनियर सिटीजन ग्राहकाने या स्कीम मध्ये एक लाख रुपये गुंतवलेत तर त्यांना मॅच्युरिटीवर एक लाख 24 हजार रुपये मिळणार आहे.
बँक ऑफ इंडिया : ही देशातील आणखी एक मोठी पीएसबी आहे. ही सरकारी बँक जेष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफ डी स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यास 7.25 टक्के या रेटने व्याज देत आहे. येथे जर ज्येष्ठ नागरिकांनी एक लाख रुपये गुंतवलेत तर त्यांना मॅच्युरिटीवर एक लाख 24 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.