FD News : आजची ही बातमी एफडी करणाऱ्यांसाठी खूपच खास राहणार आहे. मुदत ठेव योजना अर्थातच एफडी योजना ही गुंतवणुकीची एक लोकप्रिय योजना आहे. अनेकजण गुंतवणुकीसाठी एफडीला महत्त्व देतात. एफडी मधील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने या ठिकाणी गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व दिले जाते.
खरे तर सर्वजण एफडी मध्ये गुंतवणूक करण्याला पसंती दाखवतात. परंतु इतरांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक एफडी करण्याला अधिक महत्त्व दाखवतात. एफडीत केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याने या ठिकाणी गुंतवणूक करण्याला अनेक जण प्राधान्य दाखवतात.
दरम्यान आज आपण देशातील अशा काही बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना सर्वोत्कृष्ट व्याजदर देत आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सर्वोत्कृष्ट व्याज देणाऱ्या बँका
DCB बँक : ही बँक आपल्या ग्राहकांना एफडीसाठी आकर्षित करणे हे ८.१ टक्के पर्यंतचे व्याज देत आहे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि DCB बँकेत 26 महिने ते 37 महिन्यांसाठी FD केली तर तुम्हाला 8.1 टक्के व्याज मिळेल.
RBL बँक : ही बँक जेष्ठ नागरिकांना मुदत ठेवीसाठी चांगले व्याज देत आहे. RBL बँकेत FD करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना चांगले व्याज दिले जात आहे. ही बँक जेष्ठ नागरिकांना 24 महिने ते 36 महिन्यांच्या दरम्यान परिपक्व होणारी एफडीवर ८ टक्के व्याज देत आहे.
बंधन बँक : प्रायव्हेट सेक्टर मधील ही बँक आपल्या ग्राहकांना चांगले व्याज देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बंधन बँक जेष्ठ नागरिकांना एफडीवर 7.75 टक्के पर्यंतचे व्याज देत आहे. 3 ते 5 वर्ष मुदतीच्या FD वर ही बँक 7.75 टक्के व्याज देत असल्याची माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळाली आहे.
ॲक्सिस बँक : ही बँक सुद्धा गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकते. या बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळू शकतो. ॲक्सिस बँक ३ वर्षे ते ५ वर्षांपेक्षा कमी या कालावधीत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 7.60% एवढे विक्रमी व्याज देत आहे. त्यामुळे जर तुम्ही पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD मधून चांगला परतावा मिळू इच्छित असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी निश्चितच परवडणारा ठरणार आहे.