अहमदनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता ! आज अन उद्या महाराष्ट्रात तुफान पाऊस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Ahmednagar Rain Alert : गेल्या सहा ते सात दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. वादळी पावसाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोराचा पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता मात्र विदर्भातला पावसाचा जोर कमी झाला आहे.

वादळी पावसाने विदर्भातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आता पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. आगामी चार ते पाच दिवस या भागात आता वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

यामुळे मात्र राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. दरम्यान आता आपण हवामान खात्याने आज आणि उद्या महाराष्ट्रात कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्यवली आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

कुठं बरसणार वादळी पाऊस

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. या पार्श्वभूमीवर सदर विभागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जाणकारांनी केले आहे.

आज 16 एप्रिलला राज्यातील मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे दोन जिल्हे वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

तसेच आज मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने दिला आहे.

तसेच राजधानी मुंबई सह दक्षिण कोकणातील रायगड आणि उत्तर कोकणातील ठाणे या दोन जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. एकंदरीत आज महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार अशी शक्यता आहे.

दुसरीकडे, गुरुवारी राज्यातील मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही भागात हलक्या स्वरूपाचा रिमझिम पाऊस हजेरी लावेल असे आयएमडीने म्हटले आहे. यामुळे निश्चितच या संबंधित भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. खरे तर गेल्या महिन्यात देखील वादळी पाऊस झाला होता.

एवढेच नाही तर काही ठिकाणी गेल्या महिन्यातही गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे आणि त्यात आता पुन्हा एकदा आगामी चार ते पाच दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे ढग कायम राहणार असे बोलले जात आहे.

Leave a Comment