FD News : तुम्हीही गुंतवणुकीच्या तयारीत आहात का ? हो, मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरू शकते. विशेषता ज्यांना सुरक्षित गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी फायद्याची राहणार आहे. खरेतर जेव्हाही सुरक्षित गुंतवणुकीचा विषय निघतो तेव्हा बँकेची एफडी योजना सर्वाधिक फायदेशीर आणि सुरक्षित पर्याय असल्याचे सांगितले जाते.

हे तेवढेच खरे आहे. FD अर्थातच फिक्स डिपॉझिट यातून निश्चित परतावा मिळतो. पण, शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड यापेक्षा येथून मिळणारा परतावा हा किंचित कमी असतो. तथापि एफडी मधील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते.

Advertisement

हेच कारण आहे की अनेकजण आजही एफडी करण्याला विशेष महत्त्व दाखवतात. जर तुमचाही असाच प्लॅन असेल आणि तुम्हीही बँकेत एफडी करण्याच्या तयारीत असाल तर आयडीएफसी या खाजगी क्षेत्रातील एका बड्या बँकेने तुमच्यासाठी गुड न्यूज आणली आहे.

या बँकेने आपले एफडीचे व्याजदर सुधारित केले आहेत. बँकेने 21 मार्च 2024 ला एफडी व्याजदरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे बँकेने सुधारित केलेले हे दर 21 मार्चपासूनच लागू देखील झालेले आहेत.

Advertisement

अशा परिस्थितीत, जर तुमचाही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याचा प्लॅन असेल तर निश्चितच आयडीएफसी बँकेची FD योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान आता आपण आयडीएफसी बँकेचे एफडी वरील व्याजदर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे आहेत IDFC बँकेचे नवीन दर

Advertisement

आयडीएफसी बँक सामान्य ग्राहकांना फिक्स डिपॉजिट साठी 3% पासून ते 8% पर्यंतचे व्याज ऑफर करत आहे. मात्र हाच दर ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्क्यांनी वाढतो. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना आयडीएफसी बँक एफडी साठी 3.50% ते 8.50% एवढे व्याज ऑफर करत आहे.

पण हे दर दोन कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी साठी लागू आहेत. जे ग्राहक दोन कोटी पेक्षा अधिकची FD करतील म्हणजेच बल्क एफ डी करतील त्यांच्यासाठी वेगळे दर लागू राहणार आहेत.

Advertisement

तसेच बँकेकडून वेगवेगळ्या कालावधीची एफडी ऑफर केली जात आहे. सात दिवसापासून ते दहा वर्षे पर्यंतच्या कालावधीची एफडी बँक ऑफर करते.

500 दिवसांच्या एफडीवर मिळते सर्वाधिक व्याज

Advertisement

आयडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना 500 दिवसांच्या एफडीवर सर्वोच्च व्याज देत आहे. ही बँकेची सर्वात जास्त व्याज देणारी एफडी योजना आहे.

बँक या FD एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 8% व्याज ऑफर करत आहे आणि ज्येष्ठ नागरीकांना 8.50% एवढे व्याज ऑफर करत आहे. 

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *