FD News : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र असे असले तरी आजही अनेकजण बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व दाखवतात.
कारण की, बँकेच्या एफडी योजनेत केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित राहते. विशेष म्हणजे अलीकडे एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बँकांच्या माध्यमातून चांगले व्याज दिले जात आहे.
दरम्यान, जर तुम्हीही एफडी योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच फायदेशीर ठरणार आहे.
कारण की आज आपण अशा एका बँकेच्या एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून ग्राहकांना 9.25 टक्क्यांचे व्याज मिळणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या एफडी योजनेविषयी सविस्तर माहिती.
ही बँक देते सर्वाधिक व्याजदर
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने अलीकडेच आपले एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. या बँकेने आपल्या एफडी व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
बँकेने हे नवीन सुधारित दर एक मार्च 2024 पासून लागू केले आहेत. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या निवडक मुदतीच्या FD वरील व्याजदरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
बँकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी 25 महिन्यांच्या एफडीवरील व्याजदरात 0.41 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना आता अधिकचे व्याजदर मिळणार आहे.
FD चे नवीन व्याजदर
एफडीच्या व्याजदरात बदल केल्यानंतर आता सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेत FD करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना एफडीवर ४ टक्के ते ९.०१ टक्के व्याज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 4.50 टक्के ते 9.25 टक्के एवढे व्याजदर ऑफर करत आहे. दोन वर्ष आणि एक महिना कालावधी असणाऱ्या अर्थातच 25 महीने कालावधी असणाऱ्या FD साठी बँकेकडून सर्वोच्च व्याजदर दिले जात आहे.
25 महिन्यांच्या एफडी साठी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सामान्य नागरिकांना 9.01% आणि जेष्ठ नागरिकांना 9.25% एवढे व्याज देत आहे.