समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर महाराष्ट्रात तयार होणार 805 किलोमीटर लांबीचा महामार्ग ! ‘या’ जिल्ह्यांमधून जाणार, भूसंपादन सुरू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्यात सध्या स्थितीला समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून हा महामार्ग राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूरला जोडणार आहे. आतापर्यंत नागपूर ते इगतपुरी पर्यंतचे समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले असून हा भाग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.

उर्वरित 76 किलोमीटर लांबीच्या अर्थातच इगतपुरी ते आमनेदरम्यानच्या टप्प्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान याच समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर 2023 मध्ये नवीन शक्तीपीठ महामार्ग बनवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा दरम्यान विकसित होणार आहे. या महामार्गाची घोषणा माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

हा महामार्ग 805 किलोमीटर लांबीचा राहणार असून हा प्रकल्प वर्तमान शिंदे सरकारचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवणार येथून सुरू होईल आणि यवतमाळ, नांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पवनार येथे हा मार्ग संपणार आहे. या महामार्गासाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याला राज्य शासनाची मंजुरी देखील मिळाली आहे.

शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हा महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. हा मार्ग महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून प्रस्तावित करण्यात आला आहे. हा एक सहा पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार आहे. यावर २६ ठिकाणी इंटरचेंज, ४८ मोठे पूल, ३० बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग राहतील. या मार्गासाठी 86 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

भूसंपादनाचे काम झाले सुरू 

नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने या मार्गाची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. यानुसार, हा महामार्ग कोणत्या गावांमधून जाईल हे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान आता महामार्गासाठी भूसंपादन देखील सुरू झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग रिअल इस्टेट कायद्यांतर्गत मार्गासाठी आवश्यक जमीन संपादित केली जाणार आहे. या अंतर्गत बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाचे तिप्पट दर दिले जाणार आहेत.

केव्हा होणार भूमिपूजन

शक्तीपीठ महामार्गाचे भूमिपूजन 2025 मध्ये होईल असा दावा केला जात आहे. तसेच 2025 मध्ये या मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर अवघ्या पाच वर्षांच्या काळात हा संपूर्ण महामार्ग बांधला जाणार आहे. म्हणजेच 2030 मध्ये या महामार्गाचे काम पूर्ण होईल आणि हा मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होईल असा अंदाज आहे.

शक्तिपीठ महामार्ग अंतर्गत जे जिल्हे समृद्धी महामार्गाने कनेक्ट झालेले नाहीत ते जिल्हे कनेक्ट केले जाणार आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गानंतर हा देखील महामार्ग महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थित गेमचेंजर भूमिका निभावणार अशी आशा आहे.

नागपूर-गोवा प्रवास होणार सुसाट

शक्तिपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास सुसाट होणार आहे. समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्गाला जोडला जाणार असल्याने भविष्यात नागपूर ते गोवा हा प्रवास फक्त आठ तासात पूर्ण होईल अशी आशा आहे. सध्या स्थितीला नागपूर ते गोवा हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 18 तासांचा कालावधी लागतोय. पण, शक्तीपीठ महामार्गामुळे प्रवासाचा कालावधी आठ तासांवर येणार आहे अर्थातच प्रवासाच्या वेळेत दहा तासांची मोठी बचत होणार आहे.

‘शक्तीपीठ’ नाव देण्याचे कारण ?

हा मार्ग महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तीन शक्तीपीठ यांना कनेक्ट करणार आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील श्री सप्तशृंगी देवीचे अर्धे शक्तिपीठ वगळता राज्यातील उर्वरित तीन शक्तिपीठांना हा महामार्ग जोडणार आहे. कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तीपीठे शक्तिपीठ महामार्गाने परस्परांना जोडली जाणार आहेत. यामुळे राज्यातील तिन्ही शक्तिपीठांचे दर्शन घेणे भाविकांसाठी सोयीचे होणार आहे.

हेच कारण आहे की, या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्याचे कारण सांगितले होते. हा मार्ग औंढा नागनाथ अन परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंग, पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्ध रामेश्वर मंदिर यांना देखील कनेक्ट करणार आहे. त्यामुळे राज्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

Leave a Comment