FD News : तुम्हालाही तुमच्याकडे असणारा पैसा मोठा व्हावा, पैसा वाढावा असे वाटत असेल, नाही का ? मग यासाठी तुम्हीही कुठेतरी तुमचा पैसा गुंतवण्याचा प्लॅन बनवलेला असेल. काही लोक एफडी मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असतील. बँकेची एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट योजना अशी एक सुरक्षित गुंतवणुकीची योजना आहे ज्यात गुंतवणूकदारांना एक निश्चित सुरक्षित परतावा मिळतो.
शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडशी तुलना केली असता येथून मिळणारा परतावा हा निश्चितच कमी आहे मात्र एफडी मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित असते. त्यामुळे एफडी करणाऱ्यांचे प्रमाण आपल्या देशात खूपच अधिक आहे.
शिवाय अलीकडे काही बँकांनी एफडीवर चांगले व्याजदर देखील ऑफर केले आहे. आता एफडीवर दहा टक्के व्याजदर मिळवणे देखील शक्य होणार असे एक आशादायी चित्र तयार होत आहे.
कारण की देशातील काही छोट्या बँकांकडून एफडीवर 9.25 टक्क्यांपर्यंतचे व्याज दिले जात आहे. आज आपण अशाच एका बँकेची माहिती जाणून घेणार आहोत जी की, एफडीवर 9.25% पर्यंतचे विक्रमी व्याज देत आहे.
आसाम राज्यातील गुवाहाटी येथील नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेने नुकतीच एक नवीन FD स्कीम लाँच केली आहे. या नव्याने लॉन्च झालेल्या एफडी स्कीम मध्ये ग्राहकांना 10 टक्क्यांपेक्षा फक्त थोडासा कमी रिटर्न मिळतो.
अर्थातच आता भविष्यात एफडीवर दहा टक्क्यांपर्यंतचे व्याजदर मिळू शकते असे आशादाई चित्र तयार झाले आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेने 18 मार्च रोजी 9.25 टक्के व्याजदरासह एक नवीन एफडी लॉन्च केली आहे.
बँकेने यावेळी असे म्हटले आहे की, ते 366-1,095 दिवसांच्या FD वर 7.75 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.5 टक्के व्याज देत आहे. हे व्याज ५ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर उपलब्ध राहणार आहे.
कोणत्या FD वर 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळणार बर
बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँक चारशे दिवसांच्या एफडीवर आपल्या नियमित ग्राहकांना 8.40% एवढे व्याज देत आहे. तसेच चारशे दिवसांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 9.15% व्याज मिळत आहे.
याशिवाय बँकेच्या माध्यमातून 5 कोटी रुपयांपर्यंतच्या आणि 555-1,111 दिवसांच्या FD साठी नियमित ग्राहकांना 8.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.25 टक्के व्याजदर ऑफर केले जात आहे.