FD News : आपल्या भारतात आजही गुंतवणुकीसाठी अनेकजण FD ला प्राधान्य देतात. फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. फिक्स डिपॉझिट मधून एक निश्चित परतावा मिळतो शिवाय या ठिकाणी केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते. हेच कारण आहे की, अलीकडे एफडी करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
मात्र असे असले तरी ज्या बँका मुदत ठेव योजनेच्या गुंतवणूकीवर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहेत त्या बँकांमध्ये नागरिकांनी गुंतवणूक केली पाहिजे असे मत जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे.
अशा परिस्थितीत आज आपण देशातील अशा टॉप 5 बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की कमी कालावधीच्या FD साठी सर्वोत्कृष्ट व्याजदर देत आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
जन स्मॉल फायनान्स बँक : जन स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे. ही बँक सात दिवसांपासून ते 365 दिवसांच्या एफडी साठी तीन टक्क्यांपासून ते 8.50 टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर करत असल्याची माहिती समोर आली आहे. ही बँक कमी कालावधीच्या एफडीसाठी सर्वाधिक व्याज देणारी बँक आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक : या बँकेत सात दिवसांपासून ते दहा वर्षे कालावधीसाठी एफडी केली जाऊ शकते. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सात दिवस ते 365 दिवसांचा एफडी साठी 4.50% ते 7.50% यादरम्यान व्याज ऑफर करत आहे.
Yes Bank : प्रायव्हेट सेक्टर मधील येस बँक देखील आपल्या ग्राहकांना कमी कालावधीच्या FD वर चांगले व्याज देत आहे. हे बँक सात दिवस ते 365 दिवस कालावधीच्या एफडी साठी 3.25% ते 7.25 टक्के यादरम्यान व्याज देत आहे.
पंजाब नॅशनल बँक : पंजाब नॅशनल बँक ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. ही बँक सुद्धा आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगले व्याज देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सात दिवस ते 365 दिवस कालावधीच्या एफडीवर या बँकेच्या माध्यमातून तीन टक्क्यांपासून ते सात टक्क्यांपर्यंतचे व्याज दिले जात आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सात दिवस ते 365 दिवस कालावधीचा एफ डी साठी चार टक्क्यांपासून ते 6.85 टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर करत आहे.